उत्तर भारतात महिलांची वेणी कापण्याच्या काही घटना घडल्याच्या चर्चेनंतर त्यासारखाच एक प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये समोर आला आहे. मुलीला शाळेत सोडायला गेलेल्या एका महिलेने तिची वेणी कापल्याचे म्हटले आहे. आबिदा अन्सारी असे वेणी कापल्याचा दावा करणाऱ्या महिलेचं नाव आहे. हा संपूर्ण काय प्रकार आहे, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिहार, दिल्ली, राज्यस्थान, उत्तर प्रदेश, मुंबईनंतर या विचित्र प्रकाराचे लोण थेट पिंपरी-चिंचवडमध्ये आले आहे. आबिदा अन्सारी (वय ४२, रा. साईबाबा नगर, चिंचवड) या बुधवारी, १६ ऑगस्ट रोजी दुपारी बाराच्या सुमारास मुलगी मुस्कान आणि आलिया यांना महानगरपालिकेच्या शाळेतून घेण्यासाठी गेल्या होत्या. आबिदा यांच्यासोबत त्यांच्या शेजारी राहणारी महिला देखील होती. मुलींना शाळेतून घेऊन आल्यानंतर आबिदा यांना डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांनी मुलीला डोकं दाबण्यास सांगितलं. त्यावेळी मुलीच्या हातात कापलेली वेणीच आली, असे त्यांनी म्हटले आहे. घरापासून केवळ २०० मीटर अंतरावर त्यांच्या मुलीची शाळा आहे. या प्रकारामुळे आबिदा सध्या घाबरलेल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणात नक्की काय घडले हे नेमकेपणाने समजलेले नाही. या प्रकरणी अद्याप पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. या घटनेनंतर आबिदा घाबरल्या असल्यामुळे त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या घरी पाठविण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women braid cutting incidence in pimpari chinchwad
First published on: 17-08-2017 at 13:38 IST