ब्रिटिश लायब्ररीतर्फे सृजनशील लेखकांसाठी ‘रायटर्स मंत्र’ ही १७ आणि १८ ऑगस्ट अशी दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ‘द बॉडी इन द बॅक सीट’, ‘मर्डर ऑन ए साईट स्ट्रीट’ आणि ‘लॉस्ट लिबिडो अँड अदर अर्बन टेल्स’ या कादंबऱ्यांचे लेखक सलिल देसाई हे या कार्यशाळेत कादंबरीलेखनाचे तंत्र आणि मंत्र उलगडत मार्गदर्शन करणार आहेत. सिम्बायोसिस आणि ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’चे (एफटीआयआय) माजी विद्यार्थी असलेल्या देसाई यांनी व्हिडिओ, लघुपट आणि अनुबोधपटांची निर्मिती केली आहे. १६ वर्षांपुढील व्यक्ती या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊ शकतात. इच्छुकांनी अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी सुगंधी किंवा सावित्री यांच्याशी ४१००५३०७ किंवा ४१००५३१७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.