पुण्यात अभिनेत्रीला सोन्याची अंगठी चोरताना अटक

चोरीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

पुण्यात एका अभिनेत्रीला सोन्याच्या अंगठ्या चोरताना अटक करण्यात आली आहे. स्नेहलता पाटील असं त्या अभिनेत्रीचं नाव आहे. पुण्यातील कॅम्प परिसरातील एका प्रसिद्ध मॉलमधील दागिन्यांच्या दुकानात ही अभिनेत्री सोनं खरेदी करण्याच्या बहाण्याने गेली. त्यावेळी तिने दोन सोन्याच्या अंगठ्या चोरल्या. चोरीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

सीसीटीव्हीत अभिनेत्री दुकानदाराशी अंगठी खरेदी करण्याच्या बहाण्याने बोलताना दिसली. ती दुकानदाराला वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठ्या दाखवण्यास सांगते. दुकानदार त्या अंगठ्या दाखवण्यात मग्न असताना संधी साधून स्नेहलताने चलाखीने सोन्याच्या अंगठ्या चोरल्या. या अंगठ्यांची किंमत जवळपास ५० हजार रुपये इतकी असल्याचं समजतंय. लष्कर पोलीस ठाण्यात या अभिनेत्रीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला असून सीसीटीव्हीच्या मदतीने तिला तात्काळ अटक करण्यात आली.

स्नेहलता पुण्यातील कोथरुड येथे राहणारी असून तिने तीन हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Young actress arrested for stealing gold rings from a mall in pune ssv

Next Story
राज्याला वीज टंचाई भासणार नाही- पवार
ताज्या बातम्या