scorecardresearch

बाह्यवळण मार्गावर दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू ;नवीन कात्रज बोगद्याजवळ अपघात

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगद्याजवळ दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगद्याजवळ दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.केतन विरपक्ष हरसुरे (वय ३२, रा. बावधन) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. दुचाकीस्वार केतन भरधाव वेगाने बाह्यवळण मार्गावरून जात होता. नवीन कात्रज बोगद्याजवळ दुचाकी घसरल्याने केतनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. सहायक फौजदार मोहन देशमुख तपास करत आहेत. बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगदा ते नऱ्हे परिसरातील नवले पूल दरम्यान तीव्र उतार आहे. तीव्र उतारावर भरधाव वाहन चालकांचे नियंत्रण सुटून अपघाताच्या घटना घडतात.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Young man dies two wheeler falls bypass accident near new katraj tunnel mumbai bangalore bypass amy

ताज्या बातम्या