पुणे : कल्याणीनगर भागात नदीपात्रात उडी मारून एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. नदीपात्रात उडी मारलेल्या तरुणाची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली.

येरवड्यातील कल्याणीनगर भागातील पुलावरून एका तरुणाने नदीपात्रात उडी मारल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा उडी मारलेला तरुण जलपर्णीत अडकल्याचे जवानांनी पाहिले. एका झाडाचा आधार तरुणाने घेतला होता. दोर बांधून जवान नदीपात्रात उतरले. जवान तरुणाजवळ पोहोचले आणि त्याला बचावासाठी रबराची ट्यूब देण्यात आली.

pune crime news, pune youth committed suicide
पुणे: सासरच्या त्रासाला कंटाळून तरूणाची आत्महत्या
murder of girlfriend, mumbai,
मुंबई : प्रेयसीच्या हत्येप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीला अटक
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू
आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. नदीपात्रात उडी मारलेल्या तरुणाची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली.

जवानांनी त्याच्याशी संवाद साधून त्याला धीर दिला. जवानांनी नदीपात्रात पडलेल्या तरुणाची सुटका केली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणाचे वय अंदाजे २५ वर्ष असून येरवडा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रमोद सोनवणे, तांडेल राजाराम केदारी, संदीप रणदिवे, चंद्रकांत नवले, सूरज बडे, अक्षय कलशेट्टी, प्रताप फणसे, अमित सरोदे, प्रशांत नवगिरे, शरद नवगिरे, नितेश डगळे, अजिंक्य खाडे आदींनी नदीपात्रात उडी मारून त्वरीत मदत केल्याने तो बचावला.