स्तब्धतेचा आवाज म्हणजे झेन – डॉ. सतीश आळेकर

‘‘स्तब्धतेतील आवाज ऐकणे आणि आवाजातील शांतता समजून घेणे म्हणजे.. झेन! याच झेनमधून एखादा कलाकार आपल्या सृजनशीलतेचा ठाव घेत असतो,’’ असे मत ज्येष्ठ नाटककार डॉ. सतीश आळेकर यांनी सोमवारी व्यक्त केले.

‘‘स्तब्धतेतील आवाज ऐकणे आणि आवाजातील शांतता समजून घेणे म्हणजे.. झेन! याच झेनमधून एखादा कलाकार आपल्या सृजनशीलतेचा ठाव घेत असतो,’’ असे मत ज्येष्ठ नाटककार डॉ. सतीश आळेकर यांनी सोमवारी व्यक्त केले.
डॉ. राजीव शारंगपाणी यांनी लिहिलेल्या ‘झेन स्पीरिट, झेन ट्विस्ट अ‍ॅण्ड झेन फन’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभामध्ये डॉ. आळेकर बोलत होते. या वेळी डॉ. नाझिर एदल, इंग्रजी साहित्याचे अभ्यासक डॉ. कुट्टी उपस्थित होते.
या वेळी डॉ. आळेकर म्हणाले, ‘‘भारतीय कला शिकण्यासाठी परदेशी अभ्यासक भारतात आले आणि त्यातून झेनसारख्या संकल्पनांची आपल्याला ओळख झाली. कलाकारासाठी ‘झेन’ समजून घेणे आवश्यक आहे. कलाकारांना त्यांचे शरीरशास्त्र समजून घेण्यासाठी आणि आत्मभान येण्यासाठी झेन समजून घेणे आवश्यक आहे. ही दृष्टी डॉ. शारंगपाणी यांनी दिली. ‘झेन स्पीरिट, झेन ट्विस्ट अ‍ॅण्ड झेन फन’ या पुस्तकाबद्दल बोलायचे झाले, तर हे पुस्तक आवडले, तर का आवडले हे शब्दात सांगता येत नाही. पण म्हणून ते नावडतही नाही. ‘झेन’ची खरी गंमत या निरुत्तर स्तब्धतेतच आहे, ती या पुस्तकातून अनुभवायला मिळते.’’
डॉ. एदल म्हणाले, ‘‘मन हे नियंत्रणाखाली असत नाही. ते त्याच्या पद्धतीने धावतच असते. मृत्यूसारख्या अनेक स्वाभाविक आणि टाळता न येणाऱ्या गोष्टींमधूनही माणूस पळवाट काढत असतो. सुखाच्या आणि आनंदाच्या मागे धावताना हे सुख कशात आहे, ते त्याला कळतच नाही. आनंद मिळवताना नक्की कुठे थांबायचं हेही कळत नाही. त्यातून झेनसारख्या गोष्टींचा उदय झाला. कुणाचीही नक्कल न करता, स्वत्व जपणे हे आनंदाचे खरे गमक आहे.’’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Zen means sound of silences satish alekar