पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी – पीएमआरडीए) येत्या बुधवारपासून (११ सप्टेंबर) झोन दाखले ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. झोन दाखल्यांसाठी पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येऊ शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागरिकांना झोन दाखले मिळण्यासाठी संगणकप्रणाली, तसेच मोबाइल अ‍ॅपद्वारे देखील ते उपलब्ध होणार आहेत. झोन दाखला प्राप्त करण्यासाठी ऑनलाइन पेमेंट सुविधा (एनईएफटी, आरटीजीएस, नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड) पीएमआरडीएने केली आहे.  येत्या १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन झोन दाखले सुविधा ही पूर्णत: रोकड विरहित होणार आहे.

पीएमआरडीएकडून या सुविधेसाठी www.pmrda.gov.in  किंवा zonecertificate.

या संकेतस्थळांचा वापर करावा, असे आवाहन पीएमआरडीएकडून करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zone online certificate available akp
First published on: 10-09-2019 at 03:16 IST