डॉ. मानसी पाटील

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील पदार्थापासून भिन्न संस्कृतीतील पक्वानांपर्यंत, केवळ वाचताच तोंडाला पाणी आणणाऱ्या मांसाहारी रेसिपींपासून पाककृती पाहूनच हव्याहव्याशा वाटणाऱ्या ‘डेझर्ट्स’पर्यंतच्या असंख्य पाककृतींनी नटलेल्या ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ या वार्षिक विशेषांकाने नेहमीच वाचकांना भुरळ पाडली आहे. त्या त्या वर्षीच्या विशेष संकल्पनेवर आधारित पाककृतींचा समावेश असलेल्या ‘पूर्णब्रह्म’च्या आधीच्या वर्षांच्या विशेषांकांचाही वाचक शोध घेत असतात. त्यामुळेच यंदाच्या ‘कुटुंबकट्टा’मध्ये आम्ही घेऊन येत आहोत ‘पूर्णब्रह्म’च्या आधीच्या अंकांमधील काही निवडक रेसिपी दररोज..

Why has the government banned 23 dangerous dogs in the country
पिटबुल, रोटवायलर, अमेरिकन बुलडॉग… देशात २३ ‘धोकादायक’ श्वानांवर सरकारकडून बंदी का? श्वानप्रेमींचे बंदीविरुद्ध आक्षेप कोणते?
The story of Dordarshan’s iconic logo
दूरदर्शनच्या लोगोने कसे बदलले रंग? टॅगलाईन अन् चिन्हात काय बदल झालेत?
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड

साहित्य

अडीच कप मैदा, अर्धा कप साखर, पाऊण कप कोको पावडर, ३ चमचे बेकिंग सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा मीठ, २ कप बदामाचे दूध, अर्धा कप नारळ तेल, दीड कप अ‍ॅपल सॉस, २ चमचे अ‍ॅपल सिडीर व्हिनेगर, १ चमचा व्हॅनिला इसेन्स

कृती

एका भांडय़ात मैदा, साखर, कोको पावडर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि मीठ एकत्र करून घ्या. दुसऱ्या बाजूला बदामाचे दूध, अ‍ॅपल सॉस, व्हिनेगर, व्हॅनिला इसेन्स, तेल एकत्र करून घ्या. वरील दोन्ही मिश्रण मिक्सरमध्ये एकजीव करून घ्या. ८ इंच व्यासाच्या डब्यात खाली व कडेला नारळ तेलाचा पातळ हात फिरवून त्यावर मिश्रण ओता. ओव्हन ३५० डिग्री फॅरेन्हाइट तापमानाला प्रीहीट करा आणि ४० ते ४५ मिनिटे बेक करा.