अनेकांना पोळी-भाजीपेक्षा भाजी-भाकरी खायला आवडते. त्यात विशेषत: महाराष्ट्रात भाकरी म्हणजे पोटभर जेवण, असे म्हटले जाते. चवीला उत्तम व पौष्टिक अशी एक भाकरी खाल्ली तरी पोट भरते. त्यामुळे अनेकांच्या घरी ज्वारी, बाजरी, नाचणी व तांदळाची किंवा या सर्व धान्यांच्या मिक्स पिठाची भाकरी बनवली जाते. भाकरी पचायलादेखील हलकी असते. आजवर तुम्ही तांदूळ, नाचणीच्या भाकऱ्या खाल्ल्या असतील; पण आज आम्ही भाकरीचा असा एक वेगळा प्रकार सांगणार आहोत की, जो अनेकांनी यापूर्वी कधी ऐकला किंवा पाहिलाही नसेल. आज आपण गोकर्णाच्या फुलांपासून ‘निळी भाकरी’ बनविण्याची रेसिपी पाहणार आहोत. चला, तर मग जाणून घ्या ही रेसिपी…

गोकर्णाच्या फुलांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, जस्त व लोह मोठ्या प्रमाणात असते. त्यासह ही फुले मानसिक आरोग्य, सर्दी-खोकला, केसांची समस्या व मधुमेह यांसारख्या आजारांवरही गुणकारी मानली जातात. या फुलांपासून बनवलेला चहा नियमित प्यायल्यास रक्त शुद्ध होते त्यामुळे त्वचेचे विकार आपोआपच कमी होतात. त्यामुळे या फुलांपासून बनविलेली भाकरी आरोग्यासाठी एकदम पौष्टिक अशी आहे.

Moong dal samosa recipe
घरात सर्वांना नक्की आवडतील मूग डाळीचे हेल्दी समोसे; नोट करा ‘ही’ हटके रेसिपी
Make Home Made Yummy Fluffy and Moist Steam Cupcake With Few ingredients Watch Viral Video Recipe
घरच्या घरी, मोजक्या साहित्यात बनवा स्वादिष्ट, मऊ ‘कपकेक’; रेसिपीचा सोपा VIDEO बघा, साहित्य अन् कृती लिहून घ्या
Crispy batti
Video : कुरकुरीत बट्टी कशी बनवायची? एकदा व्हिडीओ पाहा अन् जाणून घ्या सोपी रेसिपी
Make healthy sorghum idli for breakfast
मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात अशी बनवा ज्वारीची हेल्दी इडली; नोट करा साहित्य अन् कृती
Pohe Kurdai Recipe in Marathi News Valvan Recipes In Marathi
ना गॅस पेटवायचा ना पीठ शिजवायचे; सोप्या पद्धतीने कमी वेळात बनवा “पोहा कुरडई”, ही घ्या सोपी रेसिपी
Mothers Day 2024 Special Badam Burfi Recipe in Marathi
Mothers Day 2024: ‘आई’साठी बनवा स्पेशल शुगर फ्री बदाम बर्फी, जाणून घ्या रेसिपी
Halwa Fish Fry Recipe In Marathi
रविवार स्पेशल आगरी कोळी पद्धतीने कुरकुरीत आणि चमचमीत “हलवा फ्राय” ही घ्या सोपी रेसिपी
How to make cheese Bread Pizza at Home In Marathi Note Down The Recipe or Method From Viral Video
घरच्या घरी फक्त दहा मिनीटांत करा ‘चीज ब्रेड पिझ्झा’; साहित्य अन् कृती लगेच लिहून घ्या

साहित्य

१) १ कप पाणी
२) ६ ते ८ गोकर्णाची सुकलेली फुले
३) १ वाटी तांदळाचे पीठ

कृती

सर्वप्रथम एका भांड्यात एक कप पाणी घेऊन, त्यात गोकर्णाची फुले पाच मिनिटे उकळून घ्या. पाणी निळसर झाल्यानंतर त्यात एक कप तांदळाचे पीठ मिसळा. त्यानंतर गॅस बंद करून हे पीठ असेच १० मिनिटे वाफवून घ्या. आता वाफवलेले पीठ एका प्लेटमध्ये काढून, चांगले मळून घ्या. त्यानंतर आपण ज्या प्रकारे तांदळाची भाकरी थापटून शेकवतो अगदी त्याच प्रकारे याची भाकरी बनवा. अशा प्रकारे तयार झाली तुमची निळी भाकरी. तुम्ही ही भाकरी मेथी किंवा कोणत्याही पालेभाजीबरोबर अथवा पिठले वा झुणक्याबरोबर खाऊ शकता.

nutribit.app या इन्स्टाग्राम अकाउंटवरून आपण गोकर्णाच्या फुलांपासून निळी भाकरी बनविण्याची रेसिपी पाहिली. तुम्हालाही ही रेसिपी जर ट्राय करून पाहायची असेल, तर तुम्ही वरील व्हिडीओची मदत घेऊ शकता.