Mango kesar Lassi: आपल्याकडे खास आंब्यांसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीची वाट आवर्जून पाहिली जाते. या दिवसात आंब्यापासून अनेक विविध रेसिपी गृहिणी ट्राय करत असतात. ज्यात कधी आंबा पोळी, आम्रखंड, आमरस, आंबा बर्फी यांसारखे अनेक पदार्थ असतात. पण, आज आम्ही तुम्हाला आंब्यापासून आंबा-केसर लस्सी कशी बनवायची हे सांगणार आहोत. ज्याच्या सेवनाने तुम्हाला आंब्यासोबत केसर आणि लस्सीचेदेखील पोषकतत्व मिळतील. चला तर जाणून घेऊया आंबा-केसर लस्सी.

साहित्य :

१. ३०० मिली दही (कमी आंबट असलेले)
२. २ कप आंब्याचा रस
३. ५-६ कप दूध
४. ८-९ चमचे साखर
५. २ चमचे वेलची पूड
६. १/२ वाटी बदाम, पिस्त्याचे बारीक काप
७. केसर काड्या

Diabetes Control Remedies
रक्तातील साखर १५ ते १० टक्के कमी करण्यासाठी जेवणात ‘या’ दोन गोष्टी वापराव्याच? डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले फायदे व मर्यादा
Carrot Smoothie Recipe In Marathi
Carrot Smoothie: मुले गाजर खात नसतील तर बनवा स्मूदी, दृष्टी वाढण्यास होईल मदत
Instant carrot pickle recipe gajar ka achar Gajar Lonche Recipe In Marathi
२ गाजराचे चटकदार लोणचे; ‘या’ लोणच्यासोबत दोन घास जास्तच खाल, ही घ्या सोपी मराठी रेसिपी
How to use onion on hair
केसांमधील कोंड्याच्या समस्येमुळे वैतागला आहात का? अशा पद्धतीने केसांना लावा कांद्याचा रस, पाहा कमाल
potato sheera recipe for fasting
उपवासासाठी खास बटाट्याच्या शिऱ्याची सोपी रेसिपी; पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती
Jaggery Sharbat Recipe
Jaggery Sharbat: उन्हाळ्यात पोटाच्या अनेक विकारांवर ठरेल रामबाण गुळाचा सरबत; लगेच नोट करा सोपी मराठी रेसिपी
try the tasty Rava Omelet
व्हेज ऑम्लेट खायचंय? मग नक्की ट्राय करा टेस्टी ‘रवा ऑम्लेट’; पटकन नोट करा साहित्य आणि कृती
Mango sheera recipe
Mango Sheera : यंदा मऊसुत आंब्याचा शिरा खाल्ला का? लगेच ही सोपी रेसिपी नोट करा, पाहा VIDEO

कृती :

हेही वाचा: उरलेल्या ब्रेडचं करायचं काय? मग ट्राय करा ‘हा’ पदार्थ; झटपट होणारी रेसिपी लगेच नोट करा

१. सर्वप्रथम घरात असलेल्या आंब्यांचा रस काढून तो मिक्सरमध्ये फिरवून घ्या.

२. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात कमी आंबट असलेले दही, दूध, साखर, केसर आणि वेलची पूड घालून सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत फिरवून घ्या.

३. त्यानंतर या मिश्रणात आंब्याचा रसदेखील मिक्स करा.

४. तयार आंबा-केसर लस्सी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.

५. आंबा-केसर लस्सी गार झाल्यानंतर त्यावर बदाम, पिस्त्याचे बारीक केलेले काप टाकून सजवा.

६. हवं तर यावर तुम्ही आंब्याचे कापदेखील टाकून सजवू शकता.

७. तयार आंबा-केसर लस्सीचा आस्वाद घ्या.