Prawn Bhaji Recipe: आपण आतापर्यंत अनेकदा कोळंबीचा रस्सा, कोळंबी फ्राय, कोळंबी मसाला अशा विविध रेसिपी केल्या असतील. पण, आज आम्ही तुम्हाला कोळंबी भजी कशी बनवायची हे सांगणार आहोत. ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे. चला तर जाणून घेऊया कोळंबी भजीची साहित्य आणि कृती…

कोळंबी भजी बनवण्यासाठी साहित्य :

१. २ वाटी सोललेली कोळंबी
२. ३ कांदे बारीक चिरलेले
३. पाव चमचा हळद
४. आलं-लसूण पेस्ट
५. १ चमचा लाल तिखट
६. २ वाटी चण्याच्या डाळीचे पीठ
७. मीठ चवीनुसार
८. तेल आवश्यकतेनुसार

Nutritious wheat laduu that are easy to make
बनवायला एकदम सोपे गव्हाचे पौष्टिक लाडू; पटकन नोट करा साहित्य आणि कृती
Monsoon bike driving tips why does bike or scooter tyre burst the prevention will save your life during riding
बाईक, स्कूटरचालकांनो ‘ही’ एक चूक बेतू शकेल जीवावर; वेळीच ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
people born on this birth date will get money wealth by mata laxmi's grace
Numerology : या तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते लक्ष्मीची कृपा, पैशांची कमतरता कधीही भासत नाही; मिळतो बक्कळ पैसा
bottle gourd thepla Quickly note down materials and recipe
दुधी भोपळ्याची भाजी म्हटल्यावर मुलं नाक मुरडतात? अशावेळी बनवा दुधीचा चमचमीत ठेपला; पटकन नोट करा साहित्य अन् कृती
Make Soybean Kebabs in just a few minutes
अवघ्या काही मिनिटांत बनवा चमचमीत ‘सोयाबीन कबाब’; नोट करा साहित्य आणि कृती
loksatta analysis about chatbot and its use created by artificial intelligence
विश्लेषण : चॅटबॉट चक्क भविष्य सांगणार? अमेरिकेत सुरू आहे अद्भुत संशोधन…
potato sheera recipe for fasting
उपवासासाठी खास बटाट्याच्या शिऱ्याची सोपी रेसिपी; पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती
Instantly make Tasty Potato Momos in 15 minutes
१५ मिनिटांत झटपट बनवा ‘बटाट्याचे चविष्ट मोमोज’; नोट करा साहित्य आणि कृती

कोळंबी भजी बनवण्याची कृती :

हेही वाचा: सफरचंद खायचा कंटाळा येतो? मग बनवा पौष्टिक सफरचंद हलवा; नोट करा साहित्य अन् कृती

१. सर्वात आधी कोळंबी स्वच्छ धुऊन घ्या, जर कोळंबी मोठी असेल त्याचे तुकडे करा.

२. त्यानंतर त्यात लाल तिखट, मीठ, हळद लावून काही वेळ झाकून ठेवा.

३. काही वेळानंतर त्यात कांदा, आलं-लसूण पेस्ट आणि बेसन पीठ मिक्स करावे.

४. किंचित पाणी ओतून भज्याचे पीठ नीट मिक्स करा.

५. आता गरम तेलामध्ये कोळंबी भजी सोडा आणि छान फ्राय करून घ्या.

६. तयार गरमा-गरम कोळंबी भजी सर्व्ह करा.