Apple Halwa Recipe: हेल्दी राहण्यासाठी डॉक्टर नेहमी सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. सफरचंद अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. ज्यामध्ये आहारातील फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन सी, बी6, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, प्रोटीन असतात. पण आपल्याला सतत सफरचंद खाण्याचा कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही सफरचंदाचा हलवा बनवू शकता. सफरचंद हलवा चविष्ट आणि तितकाच पौष्टिकही आहे.

सफरचंद हलवा बनवण्यासाठी साहित्य :

१. ४-५ मोठे सफरचंद
२. ३ चमचे तूप
३. ४ चमचे साखर
४. दूधाची साय
५. १ चमचा वेलची पूड
६. १ वाटी काजूचे बारीक काप
७. १ वाटी बदामाचे बारीक काप

Dal gandori recipe in marathi
खानदेशी पद्धतीने करा “डाळ गंडोरी” भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवा ही रेसिपी
Malvani Masala Pav Bhaji Recipe
मालवणी मसाला पावभाजी; घरीच बनवा हॉटेलसारखी चमचमीत पावभाजी, नोट करा सोपी रेसिपी
Khandeshi special Garlic Chutney Easy Recipe in marathi
खानदेशी पद्धतीनं करा लसणाची चटकदार चटणी; १ महिना टिकणाऱ्या चटणीची सोपी रेसिपी
Make Home Made Sweet Corn Cutlet Recipe with few Ingredients Your children will be loved read Marathi Recipe
घरच्या घरी बनवा मक्यापासून पौष्टीक कटलेट; लहान मुलांनाही भरपूर आवडतील, साहित्य व कृती लगेच लिहून घ्या
Want To Eat Something Special For Evening Snacks make Easy Perfect Buttery Home made Almond Butter Cookies Recipe
VIDEO: घरच्याघरी बनवा कुरकुरीत ‘बदाम कुकीज’; बेकरीतून विकत आणण्याची गरज नाही, लिहून घ्या ‘ही’ सोपी कृती
cluster beans seven amazing benefits
गवारीची भाजी खायला आवडत नाही? ‘हे’ सात जबरदस्त फायदे वाचल्यावर ही भाजी आवडीने खाल
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
Make Peanut Laddu Or Shengdana Ladoo In Maharastrian Style Try this in your home just 15 minutes recipe must try
१५ मिनिटांत कपभर गूळ, शेंगदाण्याचा बनवा पौष्टीक लाडू; मोजकं साहित्य अन् कृती लिहून घ्या

सफरचंद हलवा बनवण्यासाठी कृती :

हेही वाचा : सणासुदीला आवर्जून बनवा ‘बाजरीची पौष्टिक खीर’; पटकन नोट करा साहित्य आणि कृती

१. सर्वात आधी सफरचंद स्वच्छ धुवून घ्या आणि त्याचे दोन काप करून त्यातील बी काढून किस करून घ्या.

२. आता कढईमध्ये तूप घ्या आणि तूप गरम झाले की, काजू बदाम तुपावर काही वेळ परतून घ्या.

३. त्यानंतर मध्यम आचेवर सफरचंदाचा किस घालून सफरचंदातील पाणी कमी होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्या.

४. १५ मिनिटांनी त्यामध्ये साखर, वेलची पूड घालून हे मिश्रण एकत्र करून घ्या.

५. त्यानंतर काही वेळाने सफरचंद हलव्यामध्ये साय घालून हे मिश्रण एकत्र करून घ्या.

६. हे संपूर्ण मिश्रण जाडसर होईपर्यंत परता आणि त्यानंतर तयार सफरचंद हलवा सर्वांना सर्व्ह करा.