‘जेवायला भाजी काय करायची?’ असा प्रत्येकाला दररोज पडणारा प्रश्न असतो. तसेच आपल्या जेवणामधून शरीराला पोषण देणारे पोषक घटकदेखील मुबलक प्रमाणात जावे असा विचार सगळे करतात. मग आज आपण अशीच प्रचंड पौष्टिक आणि झटपट तयार होणारी ‘पालक-लसूणी

पालक लसूणी साहित्य

ताजे पालक

तेल

चिरलेला कांदा

टोमॅटो

लसूण

संपूर्ण लाल मिरची

लाल तिखट

हळद

धने पावडर

मीठ

भाजलेले शेंगदाणे

भाजलेली हरभरा डाळ

पालक लसूणी बनवण्याची कृती

१. पालक लसूणी बनवण्यासाठी सर्वप्रथम शेंगदाणे व हरभरा डाळ आधीच भाजून घ्या. नंतर ग्राइंडरमध्ये थोडे पाणी घालून बारीक करा. आता पालक नीट धुवून बारीक चिरून घ्या.

२. आता कढईत तेल गरम करून त्यात चिरलेला लसूण, पालक आणि मीठ घालून परतून घ्या. पालक भाजल्यावर बाहेर काढा. आता कढईत तेल गरम करून त्यात संपूर्ण लाल मिरची, जिरे, चिरलेला कांदा, लसूण (थोडासा) परतून घ्या.

३. आता त्यात टोमॅटो, हळद, धने पावडर आणि थोडे मीठ घाला. आता त्यात शेंगदाणे आणि हरभरा डाळची तयार केलेली पेस्ट घाला.

हेही वाचा >> पडवळची भाजी आवडत नाही? अशा पद्धतीने बनवा स्टफ पडवळ, सगळे खातील आवडीने

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४. थोडे पाणी घालून झाकण ठेवून शिजू द्या. भाजीतून तेल वेगळे झाले की समजा तुमची लसूणी पालक तयार आहे. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात भात किंवा पोटी सोबत गरम गरम सर्व्ह करा.