आज मला ढेमश्याची भाजी खावीशी वाटत आहे असं कोणी अपवादानच म्हणत असावं. नावडत्या भाजीच्या यादीत ढेमश्याच्या भाजीचं नाव असलं तरी ही भाजी अतिशय पौष्टिक आहे. ढेमश्याची भाजी म्हटली की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खायचा कंटाळा करतात. पण ढेमश्याची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने खाणे महत्त्वाचे आहे. अशा वेळी तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने दुधी ढेमश्याची भाजी बनवू शकता. दुपारच्या जेवणात काहीतरी वेगळी भाजी बनवायची असेल तर ही रेसिपी ट्राय करा. कोणाला न आवडणारी ढेमश्याची भाजी सुद्धा सगळे आवडीने खातील.
धेमशाची भाजी साहित्य
- १/२ किलो ढेमशे साल काढून त्याच्या फोडी केलेल्या
- अर्धवटी चणाडाळ दोन तास भिजलेली
- १ टेबल स्पून तेल
- आमचा हळद २ चमचा तिखट
- चवीनुसार मीठ थोडीशी साखर
- चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे चिमूटभर हिंग
- १५ कढीपत्त्याची पाने
धेमशाची भाजी कृती
स्टेप १
कढई गॅसवर ठेवून ती तापली की त्यामध्ये तेल घालावे तेल गरम झालं की हिंग मोहरीची,जिर कडीपत्त्याची खमंग फोडणी टाकून त्यामध्ये हळद घालावी व भिजलेली डाळ व फोडी घालून छान परताव्या.
स्टेप २
आता तेल गरम करून त्यात कोथिंबीर आणि कांद्याची फोडणी देऊ त्यानंतर चण्याची डाळ घालून घ्यावी आता चिरलेल्या ढेमस घालून घेऊ त्यानंतर आलेलसूण पेस्ट घालून छान परतून घ्यावे आणि तेलात होऊ द्यायचे आहे.
हेही वाचा >> Palak Recipe: अनोख्या पध्दतीने ‘पालक भाजी’ कशी करावी? ही घ्या सोपी रेसिपी
स्टेप ३
त्यानंतर तिखट,मीठ,हळद,धने पूड घालून छान परतून घ्यावेत आणि झाकून शिजू द्यायचे आहे ढेमस तेलात शिजवून देऊ झाकून पाॅच,दहा मिनिटं होऊ देऊ, शिजले की वरून कोथिंबीर घालून घेऊ ढेमसे भाजी तयार आहे.
ढेमश्याची भाजी फायदे?
- शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्याची क्षमता. आहार तज्ज्ञांच्या मते ढेमश्याची भाजी खूप मसाले टाकून खाण्यापेक्षा केवळ उकडून खाल्यास जास्त फायदेशीर ठरते.
- श्वासाशी संबंधित विकार असणाऱ्यांसाठी फायदेशीर भाजी आहे. ही भाजी खाल्ल्यानं श्वसन यंत्रणा मजबूत होते. खाल्ल्याने घशात अडकलेला कफ मोकळा होतो.
- ढेमश्याची भाजी नियमित खाल्ल्यास वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते. ही भाजी खाल्ल्यानं वजन कमी होतं.
- फायबरमुळे ही भाजी पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. डायरिया, डिहायड्रेशन यासारख्या समस्यांमध्ये ढेमसाची भाजी खाणं उपयुक्त ठरतं.
- त्वचा निरोगी राहाण्यासाठी भाजी खाणं उपयुक्त आहे. या भाजीतील गुणधर्म शरीराला बुरशीजन्य संसर्ग, ॲलर्जी होण्यास रोखतात.