कोकणी खाद्यसंस्कृती विविध पाककृतींनी समृद्ध आहे. यामुळे कोकणी पदार्थ केवळ भारतीयांनाच नाही तर जगभरातील खाद्यप्रेमींना भुरळ घालतात.कोकणी पदार्थांची चव त्यांच्या मसाल्यात लपलेली असते हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. मालवणी चिकन, माशाचे कालवण, काळ्या वाटण्याची उसळ, ओल्या काजूची भाजी असे अस्सल कोकणी पदार्थ पाहिले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. चला तर मग आज पाहुयात स्पेशल असं मालवणी चिकन मसाला रेसिपी

मालवणी चिकन मसाला साहित्य

  • ५०० ग्राम चिकन (स्वच्छ धुवून)
  • १ कप ओला नारळ + १०-१२ लसूण पाकळ्या + २ कांदे यांचे वाटण
  • १/२ कप चिरलेली कोथिंबीर
  • १ टेबलस्पून मालवणी गरम मसाला
  • १/२ टेबलस्पून लाल तिखट
  • १/२ टीस्पून बडीशेप पावडर
  • १/४ टीस्पून हळद
  • ३-४ टेबलस्पून तेल
  • चवीनुसार मीठ
  • मॅरीनेशन साहित्य:
  • १/२ कप दही (ऐच्छिक)
  • १ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट
  • १/४ टीस्पून हळद
  • १/४ टीस्पून लाल तिखट

मालवणी चिकन मसाला कृती

स्टेप १
प्रथम चिकन स्वच्छ धुवून त्याला मॅरीनेशन साहित्य लावून १५ मिनीटे झाकून ठेवावे.

स्टेप २
नंतर एका कढईमधे तेल गरम करुन त्यात, ओला नारळ+लसूण+कांदे यांचे वाटण घालून चांगले कडेने तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.

स्टेप ३
मग त्यात मालवणी गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि बडीशेप पावडर घालून पुन्हा चांगले परतून घ्यावे.

स्टेप ४
आता परतून झालेल्या मसाल्यात, मॅरीनेट केलेले चिकन आणि १/२ कप पाणी (जरुर असल्यास) घालून ४-५ मिनीटे झाकून शिजवावे.
(चिकनला दही लावल्याने, लवकर आणि मऊ शिजते)

हेही वाचा >> मुळ्याची भाजी, कोशिंबीर नको? थंडीत खा गरमागरम ‘मुळ्याचे पराठे’ ही घ्या सोपी रेसिपी

स्टेप ५
चिकन मसाला रस्सेदार पाहिजे असेल तर आवश्यकतेनुसार पाणी घालावे नाहीतर घट्टसर ठेवावे आणि कोथिंबीर गार्निश करुन भात, चपाती किंवा तांदळाच्या भाकरी सोबत सर्व्ह करावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

झणझणीत गावरान मटण त्याच्या सोबत गावठी बाजरीची भाकरी आणि इंद्रायणीचा रुचकर भात हे नुसतं ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटतं.