Bajra Sheera : बाजरी ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असून हिवाळ्यात बाजरीचे पदार्थ आवर्जून खाल्ले जातात. अनेकदा आहार तज्ज्ञ सुद्धा बाजरी खाण्याचा सल्ला देतात. तुम्ही नेहमी नेहमी बाजरीची भाकरी किंवा बाजरीची खिचडी खाऊन कंटाळला असाल तर आज आम्ही तुम्हाला बाजरीपासून बनवली जाणारी एक हटके आणि गोड रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही आजवर वेगवेगळ्या पदार्थांपासून बनवलेला शिरा खाल्ला असेल पण कधी बाजरीच्या पिठापासून शिरा खाल्ला आहे का? तुम्ही हिवाळ्यात बाजरीच्या पिठाचा खमंग शिरा करू शकता. हा शिरा अत्यंत पौष्टिक आणि तितकाच चवीला स्वादिष्ट वाटतो. त्यासाठी बाजरीच्या पिठाचा शिरा कसा बनवायचा, हे लगेच जाणून घ्या.
साहित्य
- तूप
- बाजरीचे पीठ
- रवा
- काजू
- बदाम
- किसलेले खोबरे
- गरम पाणी
- साखर
कृती
- सुरुवातीला एका कढईत तूप घ्यावे.
- गरम तूपात बाजरीचे पीठ चांगले भाजून घ्यावे.
- त्यात थोडा रवा टाकावा.
- बाजरीचे पीठ आणि रवा चांगला भाजून घ्यावा.
- यात आता काजू आणि बदामचे काप टाकावेत.
- त्यात बारीक किसलेले खोबरे घालावे.
- त्यानंतर यात थोडे गरम पाणी घालावे आणि सर्व मिश्रण एकत्रित करावे.
- त्यात चवीप्रमाणे साखर घालावी
- सर्व मिश्रण एकत्र करावे.
- शेवटी गरम शिऱ्यावर तूप घालावे आणि सर्व्ह करावे.
हेही वाचा : Masala Papad : फक्त पाच मिनिटांमध्ये हॉटेलसारखा मसाला पापड आता बनवा घरी, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा
न्युट्रिशनिस्ट जुही कपूर यांनी सांगितल्याप्रमाणे –
हिवाळ्यात खालील पाच कारणांमुळे बाजरी खावी.
- बाजरीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर आणि इतर पौष्टिक घटक असतात जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
- बाजरी खाल्यानंतर लगेच पोट भरतं त्यामुळे अति जेवण करणे टाळतो आणि वजन नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
- यात फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे बाजरी मधुमेहाच्या
- मॅग्नेशियम रक्तदाब कमी करण्यासाठी ओळखला जातो. यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.
- रुग्णांसाठी खूप चांगला पर्याय आहे. यामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढत नाही.
- बाजरी पचायला सोपी असते त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते.
- ग्लुटेनची अॅलर्जी असणाऱ्या लोकांनी आहारात बाजरीचा समावेश करावा.