पावसाळ्यात खिडकीत बसून पावसाचा आनंद घेत कुरकुरीत कांदा भजी खाण्याची मजा काही औरचं असते. तुम्ही आतापर्यंत अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या भजी खाल्ल्या असतील पण कधी भज्यांचा पाऊस रेसिपी ट्राय केलीय का? नाही ना… मग आम्ही तुमच्यासाठी ही आगळी-वेगळी रेसिपी घेऊन आलो आहोत.

भज्यांचा पाऊस साहित्य

२ कप बेसन
१/४ कप तांदळाचे पीठ
१ बटाटा
१ कांदा
१ काकडी
१ वांग
७-८ फ्लॉवर चे तुरे
१/४ कप किसलेला दुधी
८-९ ओव्याची पाने
१ टोमॅटो
१ शिमला मिरची
१ टिस्पून तिखट…आवडीनुसार
१/२ टीस्पून हळद
१/४ टीस्पून ओवा
१/४ टीस्पून हिंग
१/4 कप कोथिंबीर चिरून
१ टीस्पून मीठ…चवीनुसार कमी जास्त
१/२ ते १ कप पाणी….आवश्यकतेनुसार
तळण्यासाठी तेल

भज्यांचा पाऊस कृती

१. बेसन,तांदळाचे पीठ,तिखट,हळद,हिंग,ओवा कोथिंबीर हे सगळं एकत्र करून घेतले,पाणी घालून मिश्रण तयार केले.

२. कांद्याची तीन प्रकारे भजी केली. गोल रिंगचा आकारात कापले,बारीक कापले आणि उभे कापून. पिठात घोळवून तेलात तळून घेतली.

३. काकडी सोलून, गोलाकार कापून ती पिठात घोळवून तेलात तळून घेतली.शिमला मिरची उभी चिरून ती पिठात घोळवून तेलात तळून घेतली.

४. वांगी गोलाकार कापून,टोमॅटो गोलाकार कापून,बटाटे गोलाकार कापून पिठात घोळवून तेलात तळून घेतली.

५. ओव्याची पाने पिठात घोळवून तेलात एकेक पान सोडून तळून घेतले.फ्लॉवरचे तुरे पिठात घोळवून तेलात एकेक करून तळले. दुधीचा कीस पिळून मग पिठात घोळवून तेलात तळून घेतला.

५. सगळी भजी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतली.सोबत हिरव्या मिरच्या मधे चीर देऊन तळून घेतल्या.

हेही वाचा >> Chicken Soup Recipe: पावसाळ्यात शरीराला पौष्टिक असणारे एग चिकन सूप; घरी नक्की ट्राय करा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

६. गरमागरम चहासोबत आहे की नाही हा भज्यांचा धुंवाधार पाऊस….एकदम मस्त.