Bombil rolls stuffed with kolambi recipe बोंबील फ्राय, बोंबलाचं कालवण तसेच बोंबील भात तुम्ही आतापर्यंत खाल्लं असेल. तसेच चिकन चिली, सोया चिलीसुद्धा खाल्ली असेल पण तुम्ही कधी बोंबील रोल्स स्टफ्ड विथ कोलंबी खाल्लीय का? नाही ना. चल तर आज जाणून घेऊयात बोंबील रोल्स स्टफ्ड विथ कोलंबी सोपी रेसिपी. बोंबील च्या सेवनामुळे डोळ्या संबंधीचे काही विकार असतील तर ते नष्ट होत असतात. केसांसाठी देखील बोंबील खूपच उपयुक्त मानले जातात. केस गळतीची समस्या असेल तर अशा समस्या साठी देखील बोंबील खूपच फायदेशीर ठरतात.

बोंबील रोल्स स्टफ्ड विथ कोलंबी साहित्य

६ बोंबील
१ वाटी कोलंबी बारीक चिरून किंवा करंदी
४ चमचे आल
लसूण
मिरची
कोथिंबीरीची पेस्ट
१ चमचा लिंबू रस
१ मध्यम आकाराचा कांदा
२ चमचा बेसन पीठ
२ चमचा ब्रेडचा चुरा
१ चमचा हळद
२ चमचा लाल तिखट
१ चमचा चिंचेचा कोळ
चविनुसार मीठ
२ चमचा मैदा
फोडणीसाठी व तळणीसाठी तेल

बोंबील रोल्स स्टफ्ड विथ कोलंबी कृती

१. प्रथम बोंबील चिरून स्वच्छ धुवून घ्यावेत व मीठ लिंबू रस व हळद लावून ताटलीत वजन देवून दाबून ठेवावेत. १० मिनीटानंतर पाणी काढून टाकून त्यांत १/२चमचा हळद, १ चमचा लाल तिखट १ चमचाआलं लसणीची पेस्ट लावून एका चाळणीवर वाफवून घ्यावेत.

२. नंतर सोललेल्या कोलंबीला स्वच्छ धुवून त्यांत १/२ चमचा हळद, १चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ व चिंचेचा कोळ घालून मिक्स करावे. एका कढईत २ चमचे तेल तापवून कांद्यावर कोलंबी परतवून कोरडी करून घ्यावी.

३. नंतर वाफवलेल्या बोंबलातून काटे बाजूला करून घ्यावे. त्यांत २ चमचे बेसन, २चमचे ब्रेडचा चुरा, १/४ चमचा हळद, १/२ चमचा लाल तिखट १/२ चमचा गरम मसाला व चविपुरते मीठ घालून सर्व जिन्नस एकजीव करून घ्यावे.

४. नंतर तयार झालेल्या मिश्रणाची पारी करून त्यांत परतवलेल्या कोलंबीचे सारण भरून रोल करून घ्यावा व ब्रेडच्या चु-यात घोळवून ठेवावा.

५. सर्व रोल्स तयार झाल्यावर एका भांड्यात दोन चमचे मैद्याचा घोळ तयार करून घ्यावा व त्यांत तयार केलेला रोल बुडवून पुन्हा ब्रेडच्या चु-यात घोळवून तापलेल्या तेलातून सोनेरी रंगावर तळून घ्यावे.

हेही वाचा >> चिकन चिली खाऊन कंटाळलात मग “बोंबील चिली” बनवून पाहा; एकदा खाल तर खातच रहाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

६. असे हे तयार झालेले चमचमित बोंबील रोल्स हिरवी चटणी व साॉसबरोबर गरमागरम सर्व्ह करावेत.