Marathwada Sushila Recipe : नेहमी नेहमी नाश्त्यात काय बनवावं, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. षौष्टिक आणि स्वादिष्ट नाश्ता निवडताना आणखी विचार करावा लागतो. तुम्ही जर दररोज पोहे, उपमा, डोसा, इडली. ढोकळा खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही एखादी हटके रेसिपी करू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हटके रेसिपी म्हणजे कोणती? आज आम्ही तुम्हाला अशीच एक अनोखी आणि हटके रेसिपी सांगणार आहोत. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये वेगवेगळी खाद्यसंस्कृती पाहायला मिळते. आज आपण मराठवाड्यातील सर्वात लोकप्रिय नाश्त्याची रेसिपी जाणून घेणार आहोत. तुम्ही सुशीलाविषयी ऐकले आहे का? तुम्हाला वाटेल सुशीला म्हणजे काय? तर सुशीला हे एखाद्या मुलीचे नाव नसून पदार्थाचे नाव आहे. सुशीला हा पदार्थ तुम्ही नाश्त्याला बनवू शकता. मराठवाड्यामध्ये हा पदार्थ सर्वात जास्त प्रमाणात बनविला जातो. चवीला अप्रतिम आणि बनवायला खूप सोपी असलेला हा पदार्थ तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये किंवा इतर कोणत्याही वेळी भूक लागेल तेव्हा झटपट बनवू शकता. हा पदार्थ कसा बनवायचा आणि त्यासाठी कोणते साहित्य घ्यावेत, याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

साहित्य

  • चुरमुरे
  • बारीक चिरलेला कांदा
  • बारीक चिरलेली मिरची
  • दाळ
  • भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट
  • हिंग
  • हळद
  • मीठ
  • कढीपत्ता
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • मोहरी
  • जिरे

हेही वाचा : विकतचं कशाला? तुमचं आवडतं ‘स्निकर्स चॉकलेट’ घरीच बनवा; VIDEO तून सोपी कृती पाहा…

कृती

  • सुरूवातीला दाळ (दालिया) खलबत्त्यात बारीक करून घ्या आणि भरड तयार करा.
  • त्यानंतर चुरमुरे घ्यायचे आणि चुरमुऱ्यामध्ये पाणी घालायचं
  • एका मिनिटानंतर चुरमुरे पाण्यातून बाहेर काढायचे.
  • पाणी चांगल्याने निथळून घ्यायचे.
  • गॅसवर एका कढईत तेल घ्या आणि गरम करा
  • गरम तेलात मोहरी, जिरे, आणि हिंग टाका
  • त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाका, कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची टाका आणि कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत चांगला परतून घ्या.

हेही वाचा : खानदेशी पद्धतीने करा ‘खानदेशी वांग्याचं भरीत पुरी’; भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवा ही रेसिपी

Use of plastic will be dangerous for agriculture
प्लास्टिकचा भस्मासूर शेतांना गिळंकृत करू पाहतोय…
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
ST employees and officers
बदल्यांमधील गैरप्रकार थांबणार, आता कोणत्याही मोठ्या अधिकाऱ्याचा हस्तक्षेप…
bike taking petrol fire
पेट्रोल भरताना बाईकचालकाच्या कोणत्या चुकीमुळे आग लागते? अशा दुर्घटना टाळण्यासाठी ‘या’ महत्त्वाच्या टिप्स ठरतील फायदेशीर
Working Women
सासूने केलं म्हणून सुनांनीही करावं? नोकरदार सुनांची घुसमट समजेल का?
DJ ban order, Ganesh utsav, High Court mumbai,
डीजे बंदीचा आदेश गणेशोत्सवापुरता मर्यादित नाही, तो सगळ्याच मिरवणुकांना लागू – उच्च न्यायलयाची स्पष्टोक्ती
Advanced Artificial Intelligence Techniques for Flood Forecasting
कुतूहल : पुराच्या अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
shani gochar 2024 saturn margi in kumbh these zodiac sign will be lucky
दिवाळीनंतर ‘या’ तीन राशीच्या लोकांना लक्ष्मी देणार धनाचा हंडा! शनी मार्गस्थ असल्याने नोकरी-व्यवसायात मिळणार यशच यश
  • त्यात हळद घाला आणि चांगले मिश्रण एकत्र करा.
  • त्यानंतर पाण्यात भिजवून घेतलेले चुरमुरे टाका आणि सर्व मिश्रण एकजीव करा.
  • त्यानंतर त्यात डाळीची भरड घाला. त्याचबरोबर शेंगदाण्याचा कुट टाका आणि चवीनुसार मीठ टाका. सर्व मिसळून घ्या.
  • त्यानंतर त्यावर एक झाकण ठेवून एक वाफ काढून घ्या.
  • वाफ काढल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
  • खमंग चवदार सुशीला तयार होईल.