Kadha Recipe for cold, cough and fever: ऋतू बदलानंतर अनेकांना लहान मोठे आजार होत असतात. सध्या व्हायरल कोल्ड म्हणजेच सर्दी खोकल्याची साथ सुरू आहे. यामुळे जवळजवळ सगळ्यांनाच सर्दी खोकल्याचा त्रास होतोय. दिवाळीत फोडलेल्या फटाक्यांमुळे आणि प्रदुषणामुळे हा त्रास दुपटीने वाढला आहे. वैद्यकीय सल्ला घेऊनही अनेकांचा आजार जशाच्या तसा आहे. त्यामुळे आज आपण सर्दी, खोकला तसेच तापासाठी घरच्याघरी एक सोपा काढा कसा करायचा हे जाणून घेणार आहोत.

सर्दी, खोकला आणि तापासाठी हा एक जुना घरगुती उपाय आहे. घरी सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांनी हा काढा बनवला जातो. लवंग आणि काळी मिरी कफनाशक म्हणून काम करतात, तर तुळशी, आले, मध आणि कच्ची हळद दाहक म्हणून काम करतात. गरम पाण्यामुळे जंतू नष्ट होण्यास मदत होते.

हेही वाचा… Soyabean Bhurji Recipe: ‘सोयाबीन भुर्जी’ एकदा ट्राय कराच! रेसिपी पाहून तोंडाला सुटेल पाणी

साहित्य

२-३ लवंग

३- ४ काळी मिरी

१/२ टीस्पून कच्ची हळद किसून

१/२ टीस्पून किसलेले आले

१ टीस्पून मध

४ कप पाणी

हेही वाचा… Oreo Pancake Recipe: काहीतरी गोड खायचंय? मग लगेच बनवा ‘ओरिओ पॅनकेक’, याची रेसिपी पाहून तोंडाला सुटेल पाणी

कृती

१. सर्वप्रथम मध सोडून सर्व साहित्य कुटून घ्या

२. एका पॅनमध्ये सर्व क्रश साहित्य १५ सेकंद भाजून घ्या आणि ४ कप पाणी घाला

३. १० मिनिटे उकळू द्या. चाळून घ्या आणि मध घाला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४. ताबडतोब सर्व्ह करा आणि गरम गरम प्या.