Karle Bhaji : कारले हा शब्द जरी ऐकला तरू कडू हा शब्द आपोआप तोंडातून बाहेर पडतो. कारले कडू असतात असा आपला सर्वांचा समज आहे. त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण कारले खायला टाळतात. कारल्याची भाजी तर अनेकांना आवडत नाही. जर तुमची मुले सुद्धा कारले खात नसतील तर आज आम्ही तुम्हाला कारल्यापासून बनवला जाणारा एक हटके पदार्थ सांगणार आहोत. तुम्ही कारल्याची भजी कधी खाल्ली आहे का?

तुम्हाला वाटेल कारल्याची भजी चवीला कशी वाटणार? आपल्यापैकी अनेकांनी कारल्याची भजीविषयी कधीही ऐकले किंवा वाचले नसतील पण कारल्याची भजी चवीला अत्यंत स्वादिष्ट लागतात.याशिवाय कारले आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. तुम्ही ही कारल्याची भजी आवडीने सर्वांना खाऊ घालू शकता. ही कारल्याची भजी कशी बनवायची, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर टेन्शन घेऊ नका, आम्ही तुम्हाला एक सोपी पद्धत सांगणार आहोत. त्यासाठी ही सोपी रेसिपी लगेच नोट करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साहित्य

  • कारले
  • हिंग
  • कढीपत्ता
  • हळद
  • लाल तिखट
  • जिरे पावडर
  • कोथिंबीर
  • मीठ
  • बेसन
  • तांदळाचे पीठ
  • तेल

हेही वाचा : वीकेंडला बनवा ढाबा स्टाइल पनीर भूर्जी! झटपट होणारी ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

कृती

  • सुरुवातीला कारले स्वच्छ धुवून घ्या.
  • त्यानंतर या कारल्याचे गोल गोल बारीक काप करा.
  • कारले कापल्यानंतर त्यातील बिया काढून घ्या.
  • एका भांड्यामध्ये हे कापलेले कारले टाका आणि त्यावर हिंग, हळद, लाल तिखट, जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घाला.
  • त्यानंतर त्यावर लिंबाचा रस चांगला पिळून घ्या.
  • त्यात थोडे तांदळाचे पीठ आणि थोडे बेसन घाला
  • हे सर्व मिश्रण कारल्याला धरुन हाताने एकजीव करून घ्या.
  • त्यानंतर १५ मिनिटे हे मिश्रण झाकून ठेवा.
  • तो पर्यंत एका बाऊलमध्ये बेसन घ्या.
  • त्यात हे तांदळाचे पीठ घाला.
  • त्यानंतर त्यात थोडे चवीनुसार मीठ घाला.
  • त्यानंतर हे मिश्रण सुद्धा भजी काढता येईल इतके घट्ट पाण्याने भिजवून घ्या.
  • गॅसवर कढईत तेल गरम करा.
  • १५ मिनिटे भिजवून ठेवलेल्या कारल्याचा एक एक तुकडा घ्या आणि हा तुकडा बेसन आणि तांदळाच्या पीठात बुडवून गरम तेलात सोडा.
  • कमी आचेवर ही कारल्याची भजी तळून घ्या.
  • अतिशय सुंदर आणि कुरकुरीत भजी होतात.
  • ही भजी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
  • तुम्ही ही भजी तुमच्या आवडत्या चटणीबरोबर खाऊ शकता.