Crispy Potato Shorts Recipe: बटाट्याचे अनेक पदार्थ आपण अनेकदा ट्राय केलं असतील. फ्रेंच फ्राईज, बटाट्याचे काप, बटाट्याची भजी असे अनेक पदार्थ अगदी काहीच मिनिटांत आपण घरच्या घरी बनवत असतो. पण नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा येतो आणि काहीतरी वेगळं खायचं मन करतं. पण नवीन गोष्टी ट्राय करायच्या म्हटल्या तर त्यात खूप वेळही जातो. पण आपण एक अशी रेसिपी जाणून घेणार आहोत जी झटपट तर तयार होतेच आणि क्रिस्पी, चवदारही होते. चला तर मग जाणून घेऊया ‘क्रिस्पी पोटॅटो शॉर्ट्स’ची रेसिपी.

साहित्य

२ उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे

१ चिरलेले कांदा

हिरवी मिरची

४-५ टेबलस्पून ब्रेडक्रम्ब्स

हिरवी कोथिंबीर

लहान लहान गोळे

कॉर्नफ्लेक्स

हेही वाचा… Dahi Kabab Recipe: अगदी सोप्या पद्धतीने बनवा ‘दही कबाब’, चवदार रेसिपी लगेच लिहून घ्या

कृती

प्रथम २ उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे घ्या. त्यात १ चिरलेले कांदा आणि हिरवी मिरची घाला.

नंतर १ टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर, अर्धा टेबलस्पून मीठ, अर्धा टेबलस्पून धणे पावडर आणि अर्धा टेबलस्पून गरम मसाला घाला.

४-५ टेबलस्पून ब्रेडक्रम्ब्स आणि हिरवी कोथिंबीर घाला.

या मिश्रणाचे आता लहान लहान गोळे बनवा.

त्याला कॉर्नफ्लेक्स आणि ब्रेडक्रम्ब्समध्ये घोळून घ्या

मध्यम आचेवर तळा.

तुमचे चवदार आणि कुरकुरीत बॉल्स तयार आहेत.

हेही वाचा… संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा ‘क्रिस्पी चिली गार्लिक बाईट्स’; लहान मुलंही आवडीने खातील

पाहा VIDEO

View this post on Instagram

A post shared by Mansi Chaudhary (@khana_peena_recipe)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

*ही रेसिपी @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.