Crunchy Potato Kachori: नववर्षाला सुरूवात झाली आहे. तसंच खव्वयेप्रमींना नवनवीन रेसिपी ट्राय करण्याचीही उत्सुकता वाढली आहे. रोज नाश्त्याला काय बनवायचं, हा प्रश्न नेहमीच सगळ्यांना पडतो. पण कमीतकमी वेळेत नेमकं काय करायचं हेदेखील कळत नाही. म्हणून आज आपण एक नवीन रेसिपी जाणून घेणार आहोत. जी क्रिस्पीदेखील आहे आणि चवदारदेखील. आज आपण जाणून घेणार आहोत, क्रंची पोटॅटो रेसिपी.
साहित्य
हिरव्या मिरच्या
१ टे.स्पून जीरं
१ कापलेला कांदा
१ टे.स्पून काश्मिरी लाल मिरची
अर्धा टे.स्पून हळद
अर्धा टे.स्पून धणे पूड
मीठ
अर्धा टे.स्पून गरम मसाला
२ उकडलेली आणि मॅश केलेली बटाटी
हिरवी कोथिंबीर
१ वाटी मैदा
२ टे.स्पून तेल
मैद्या
कृती
- स्टफिंगसाठी: एका पातेल्यात कापलेल्या हिरव्या मिरच्या, १ टे.स्पून जीरं आणि १ कापलेला कांदा घाला. त्याला चांगलं भाजून घ्या. मग त्यात १ टे.स्पून काश्मिरी लाल मिरची, अर्धा टे.स्पून हळद, अर्धा टे.स्पून धणे पूड, अर्धा टे.स्पून मीठ आणि अर्धा टे.स्पून गरम मसाला घाला.
- त्यात २ उकडलेली आणि मॅश केलेली बटाटी आणि थोडी हिरवी कोथिंबीर घाला.
- पिठासाठी: एका भांड्यात १ वाटी मैदा, अर्धा टे.स्पून मीठ, २ टे.स्पून तेल आणि पाणी घाला. मऊ पीठ मळा.
- त्यातल्या पिठाने पोळीचा आकार द्या आणि थोडे तेल लावून, मैद्या लावून, लाटून घ्या.
- आता त्यात स्टफिंग भरा आणि व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे कचोरीसारखं फोल्ड करा.
- जोपर्यंत ते कुरकुरीत होत नाहीत तोपर्यंत ते कमी आचेवर तळा.
- तुमची कुरकुरीत आलू कचोरी तयार आहे.
पाहा व्हिडीओ
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
*ही रेसिपी @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.