Sunday Special Non Veg Dish: आपल्याकडे रविवार आणि नॉन व्हेज असं समीकरण बहुतांश घरांमध्ये असतं. सुट्टीच्या दिवशी घरच्यांसह चमचमीत नॉन व्हेज खाण्याची मज्जाच काही और असते. शनिवारी रात्री उद्या जेवणामध्ये काय बनणार हे ठरत असते. त्याशिवाय सकाळी उठून बाजारातून चिकन/ मटण कोण आणणार ही ड्युटी सुद्धा लागते. रविवारच्या दुपारी मस्त जेवण करुन घरातल्या लोकांबरोबर गप्पा मारल्याने आठवड्याचा थकवा नाहीसा होतो. पण काही वेळेस रविवारी जेवणात काय बनवू असा प्रश्न घरात्या गृहिणीला पडतो. तेच ते पदार्थ खाऊन घरातले सगळेजण कंटाळले असतात. अशा वेळी काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल, तर तुम्ही मटण कलेजी मसाला ट्राय करु शकता.
मटण कलेजी मसाला साहित्य
- ५०० ग्रॅम कलेजी
- १/२ कप कांदा
- १/२ कप टोमॅटो
- १.५ टेबलस्पून मिक्स मसाला
- १/२ टीस्पून हळद
- १ टिस्पून गरम मसाला
- २ टेबलस्पून आललसूण मिरची कोथिंबीर पेस्ट
- २ टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचे वाटण
- २ टीस्पून मीठ
- तुकडा फोडणीत टाकण्यासाठी..१ तमालपत्र, दालचीनी
- ३ टेबलस्पून तेल
- २ टेबलस्पून कोथिंबीर
मटण कलेजी मसाला बनवण्याची कृती
स्टेप १
कांदा,टोमॅटो चिरून घ्या. सुके खोबरे भाजून वाटून घ्या.आललसूण मिरची कोथिंबीर पेस्ट करून घ्या.माझ्याकडे नेहमी वाटलेले असते.
स्टेप २
आता कढईत किंवा घाई असेल तर छोटा कुकर घ्या. तेल घाला तापले की तमालपत्र, दालचिनी घाला, कांद्याला लालसर परतून घ्या, आता त्यात सर्व मसाले वाटणे घाला आणि परता.
स्टेप ३
नंतर टोमॅटो घाला नी मऊ होईपर्यंत शिजवा.शेवटी कलेजी घाला परतून घ्या नी वाफेवर शिजवायला ठेवा किंवा थोड्याचवेळात कुकरमधे असेच शिजवून थोडे पाणी घालून 3 शिट्ट्या घ्या. शेवटी कोथिंबीर घाला.
हेही वाचा >> Palak Recipe: अनोख्या पध्दतीने ‘पालक भाजी’ कशी करावी? ही घ्या सोपी रेसिपी
स्टेप ४
मटण कलेजी मसाला तयार आहे नुसतीच स्टार्टर म्हणून खा किंवा चपाती, भाकरी बरोबर खाऊ छान लागते.