Potato Sheera Recipe: अनेक महिलांना सतत विविध रेसिपी ट्राय करायला आवडतात. त्याशिवाय लहान मुलांनाही नवनवीन खाद्यपदार्थांची आवड असते. तुम्ही आतापर्यंत रव्याचा शिरा, रताळ्याचा शिरा खाल्ला असेल; पण आज आम्ही तुम्हाला बटाट्याचा शिरा कसा बनवायचा हे सांगणार आहोत. ही रेसिपी बनवायला एकदमी सोपी आणि चविष्ट आहे. त्याशिवाय ही रेसिपी तुम्ही उपवासाच्या दिवशीही खाऊ शकता.

बटाट्याचा शिरा बनविण्यासाठी साहित्य:

१. ५-६ उकडलेले बटाटे
२. २ कप साखर
३. ४-५ चमचे तूप
४. १/२ वाटी काजू-बदामाचे तुकडे

बटाट्याचा शिरा बनविण्याची कृती:

१. सर्वांत आधी बटाटे स्वच्छ धुऊन घ्या आणि ते उकडून घ्या.

२. बटाटे उकडल्यानंतर ते साल काढून स्मॅश करून घ्या.

३. त्यानंतर एका गरम कढईत तूप घालून, त्यात बटाट्याचा गर घालावा आणि व्यवस्थित परतून घ्यावे.

४. पाच मिनिटे परतल्यानंतर त्यात साखर घालावी.

५. आता या मिश्रणात साखर एकरूप झाल्यानंतर त्यावर सुक्या मेव्याचे तुकडे घालावेत.

६. हे सगळे मिश्रण पुन्हा दोन-तीन मिनिटे परतून घेतल्यावर गॅस बंद करून घ्यावा.

हेही वाचा: १५ मिनिटांत झटपट बनवा ‘बटाट्याचे चविष्ट मोमोज’; नोट करा साहित्य आणि कृती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

७. आता तयार झालेल्या गरमागरम बटाट्याचा शिऱ्याचा आस्वाद घ्यावा.