रविवार म्हणजे नॉन व्हेज असं समीकरण बहुतांश मराठी घरांमध्ये पाहायला मिळते. काहीजणांकडे तर रविवारी ठरवून नॉन व्हेज खाल्ले जाते. रविवारच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे घरामध्ये सर्वजण असतात. अशा वेळी आराम करायच्या दिवशी चमचमीत काहीतरी खायला मिळालं तर किती बरं होईल असं प्रत्येकाला वाटत असते.प्रत्येक सन्डेला चिकन,मटण खाऊन कंटाळा येतो, तेव्हा पटकन होणारा पदार्थ करावा असे वाटते. गावरान रेसिपी म्हटलं की झटपट तयार होणाऱ्या झणझणीत व साध्या सोप्या रेसिपी असतात. याच्या वासानेच तोंडाला पाणी सुटते आणि चार घास जास्तीचे जेवण जाते. अशा मस्त गावरान खर्डा मच्छीची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल.

गावरान खर्डा मांदेली साहित्य

curd in any food be dangerous
कोणत्याही पदार्थांमध्ये दह्याचा सतत वापर करणं ठरू शकतं घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
tomato rice
रोज रोज भाजी-पोळी खाऊन कंटाळला आहात? मग आज बनवा टोमॅटो पुलाव तेही झटपट
Aloo Bhujia Recipe
आलू भुजिया बनवण्याची सोपी रेसिपी नक्की ट्राय करा; वाचा साहित्य आणि कृती
students revealing the contents of their lunch boxes
Viral Video: ‘जिलेबी देणाऱ्या आईला भेटायचंय…’ चिमुकल्यांच्या डब्यातील पदार्थ पाहून तुम्हीही व्हाल थक्क; म्हणाल, ‘आमच्या वेळी…
Make delicious kheer
दिवाळीतील मिठाई कधी संपणार, असा प्रश्न पडलाय? मग झटपट बनवा मिठाईची स्वादिष्ट खीर
air quality deteriorated in pune city due to diwali firecracker
शहरभर फटाक्यांची तुफान आतषबाजी… हवेची गुणवत्ता खालावली…

२५-३० मोठ्या आकाराची मांदेली
४ हिरव्या मिरच्या
१ वाटी हिरवीगार ताजी कोथंबीर
२ चमचे ओलं खोबरं
८ लसूण पाकळ्या
१ इंच आल्याचा तुकडा
२ चमचे चिंचेचा कोळ
१ तुमचा तिरफळं
२ चमचे तेल
मीठ चवीनुसार
२ कांदे बारीक चिरून
१/२ चमचा हळद
१ चमचा लाल मिरची पावडर

गावरान खर्डा मांदेली कृती

१. प्रथम बाजारातून आणलेली मांदेली काढून आणि साफ करून मीठ लावून दहा मिनिटे ठेवावीत.

२. कोथिंबीर, मिरच्या,लसूण,आलं आणि खोबरं व चिंच हे सर्व मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावे. पाटा असल्यास पाट्यावर वाटलं तर आणखीन जास्त चव येते. सर्वात शेवटी त्यात भिजत घातलेली त्रीफळा एकदा फिरवून घ्यावीत.

३. कढईत तेल घालून बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून नंतर वाटलेलं हिरवं वाटण खमंग वास येईपर्यंत परतून घ्यावे. व नंतर त्यात हळद आणि मिरची घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे आणि नंतर शेवटी मांदेली व मीठ घालावी. हलक्या हाताने सर्व परतून घ्यावे.

हेही वाचा >> खानदेशी पद्धतीने करा ‘खानदेशी वांग्याचं भरीत पुरी’; भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवा ही रेसिपी

४. दोन मिनिटं झाकून ठेवावे आणि गरमागरम तांदळाच्या भाकरी बरोबर सर्व्ह करावे.