मैद्यापेक्षा कणकेचा वापर करणं केव्हाही उत्तम. कणकेवर कमी प्रक्रिया केली जाते, त्यामुळे त्यात पोषकद्रव्यं असतात. निरोगी शरीरासाठी आवश्यक असणारी फायबर आणि प्रथिनं यांचा स्रोत म्हणजे कणिक. हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका कमी होण्यास मदत होते. अशा या पौष्टिक कणकेचा वापर करून निरनिराळे गोड पदार्थ बनवू शकतो. धी या पीठापासून लाडू करुन पाहिले आहेत का? अर्थात, निम्म्याहून अधिकांचं उत्तर नाही असंच असेल. परंतु, हे लाडू अत्यंत पौष्टिक आहेत. विशेष म्हणजे त्यात साखर, तूप यासारखे पदार्थ नाहीत. त्यामुळे डाएट करणारेदेखील हे लाडू खाऊ शकतात. म्हणूनच, हिवाळा किंवा पावसाळ्यात लहान मुले व वृद्धांच्या आहारात त्याचा समावेश आवर्जुन केला पाहिजे. म्हणूनच, हे लाडू कसे तयार करायचे त्याची कृती जाणून घेऊयात.

साहित्य –

  • गव्हाचं पीठ – १ कप
  • खजूर – बारीक तुकडे करुन २ कप
  • मध – १ कप
  • अक्रोड -१ कप
  • बदाम – १कप
  • मणुका – २ चमचे
  • वेलची व जायफळ पूड – चवीनुसार
  • मीठ – चिमुटभर

कृती –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • प्रथम मंद आचेवर गव्हाचं पीठ छान खरपूस भाजून घ्या. त्यानंतर अक्रोड व बदाम छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्या. परंतु, करपणार नाही याची काळजी घ्या.
  • अक्रोड व बदाम गरम असतानाच मिक्समध्ये त्याची पूड करुन घ्या. गरम असताना ग्राईंड केल्यामुळे त्याला आपोआप तेल सुटेल, ज्यामुळे लाडू करताना अतिरिक्त तुपाची गरज लागणार नाही.
  • त्यानंतर, खजुराची पेस्ट करुन घ्या. मात्र, ही पेस्ट करताना त्यात पाणी घालू नका. त्याऐवजी मध घाला. त्यानंतर गव्हाचं पीठ, खजुराची पेस्ट आणि अक्रोड, बदामची पेस्ट एका पातेल्यात एकत्र करा.
  • त्यात वेलची व जायफळ पूड, मीठ घाला. त्यानंतर हे मिश्रण नीट एकत्र करुन त्याचे लाडू वळा आणि त्यावर मणुके लावा.

हेही वाचा – Paneer Tikka Recipe: पावसाळ्यात संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का!

  • पीठ कोरडं किंवा भगभगीत झालं असेल तर त्यावर कोमट दुधाचा किंचितसा हबका मारा. मात्र, जास्त होणार नाही याची काळजी घ्या