scorecardresearch

होळीच्या दिवशी तेच ते पदार्थ खाऊन कंटाळला आहात? मग ‘हे’ कमी कॅलरीज असलेले पदार्थ ट्राय कराच!

Holi special food items: हे टेस्टी आणि हेल्दी खाद्यपदार्थ खाल्याने शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढणार नाही.

Holi special food items
होळीला खाल्ले जाणारे पदार्थ (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Holi special food items: हिंदू दिनदर्शिकेनुसार, फाल्गुन शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी होळीचा सण साजरा केला जातो. वाईट प्रवृत्तींवर सत्याचा पराजय झाल्याने या सणाला आपल्याकडे फार महत्त्व आहे. होळीमुळे उन्हाळ्याला सुरुवात झाल्याचे संकेतही मिळतात. महाराष्ट्रामध्ये होलिका दहनाच्या वेळी पुरण पोळीचा नैवेद्य असतो. होलिका दहनाची विधी संपन्न झाल्यानंतर रात्री पुरणपोळी आणि कटाची आमटी यावर लोक ताव मारतात. उत्तर भारतामध्ये धुळवड सुरु असताना गुजिया (सोप्या भाषेत करंजी) खाल्ली जाते. तर काही ठिकाणी भांग, थंडाईचे सेवन केले जाते.

होळीच्या सणाला तयार केले जाणाऱ्या बऱ्याचश्या पदार्थांमध्ये हाय-कॅलरीज असतात असे काहीजण म्हणत असतात. अशा कॅलरी कॉन्शियस लोकांना होळीला चविष्ट पदार्थ खायचे असतात. पण कॅलरीज वाढतील अशी भीती सतत त्यांच्या मनामध्ये येत असते. या लोकांसाठी आम्ही काही खास टेस्टी आणि हेल्दी पदार्थांची माहिती घेऊन आलो आहोत.

बेक केलेला गुजिया

गव्हाच्या पिठापासून तयार केला जाणारा हा पदार्थ तेलामध्ये तळून बनवला जातो. ओव्हनमध्ये बेक करुनही गुजिया बनवता येतो. हा पदार्थ बनवताना रवा, सेका मेवा आणि गुळ यांचा वापर केला जातो.

ओट्स इडली

ओट्स शरीरासाठी फायदेशीर असतात. रवा आणि ओट्स यांना एकत्र करुन हा पदार्थ बनवला जातो. रंग खेळण्याआधी किंवा खेळल्यानंतर हा लो कॅलरी असलेला पदार्थ तुम्ही खाऊ शकता.

बेक मूग डाळ दही वडा

बेक केलेल्या मूग डाळ वड्यामध्ये साध्या डाळ वड्याच्या तुलनेमध्ये खूप कमी कॅलरीज असतात. या चविष्ट वड्यात ९५ कॅलरीज असतात. हा चविष्ठ पदार्थ तुम्ही कधीही खाऊ शकता.

आणखी वाचा – Holi 2023: ‘लठमार’, ‘भस्म होळी’ ते ‘दोल जत्रा’; भारतातील विविध भागांमध्ये अशी साजरी केली जाते होळी

सोया किंवा बदामाच्या दूधापासून तयार केलेला मालपुआ

सोया, बदाम दूध, ओट्स अशा काही पदार्थांपासून तुम्ही घरच्या घरी मालपुआ बनवू शकता. यामध्ये १०५ ते ११० इतक्या प्रमाणामध्ये कॅलरीज असतात.

बेक नमक पारा

गव्हाचे पीठ, ओवा, मीठ यांपासून बनवला जाणारा नमक पारा हा पदार्थ उत्तर भारतामध्ये खाल्ला जातो. कमी कॅलरीज असल्याने हा हेल्दी आणि टेस्टी पर्याय निवडू शकता. हा पदार्थ तळून किंवा बेक करुन बनवता येतो.

या व्यतिरिक्त बदामाच्या दूधाची थंडाई, दुधी भोपळ्याचा हलवा, संत्र्याची खीर असे कमी कॅलरी असलेले पदार्थही होळीच्या दिवशी तयार करु हा सण साजरा करु शकता.

मराठीतील सर्व रेसिपी ( Recipes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-03-2023 at 11:25 IST