[content_full]

प्रत्येक शहराची एक अस्मिता असते, एक मानबिंदू असतो. खाण्याच्या बाबतीत बोलायचं झालं, तर या मानबिंदूला `खानबिंदू` असं म्हणता येईल. कोल्हापूरची मिसळ किंवा तांबडा-पांढरा रस्सा, मुंबईची भेळ, नागपूरचा वडाभात, खानदेशी भरीत, लोणावळ्याची चिक्की, तशी पुण्याची बाकरवडी. पुण्यात अनेक मिसळीही प्रसिद्ध आहेत, पण त्यांना मानबिंदू वगैरे म्हणणं जरा धाडसाचं ठरेल. पुण्याच्या बाकरवडीला मात्र पर्याय नाही. पुणेकरांकडे राहायला आलेल्या पाहुण्यांना एकदातरी या बाकरवडीची चव चाखायची असते. शिदोरी म्हणून बरोबर घेऊन जाण्यासाठी बाकरवडीसारखा दुसरा चांगला पर्याय नसतो. आपापल्या गावाला गेल्यानंतर पुण्याची बाकरवडी घेऊन आलो, हे सांगणं हाही अभिमानाचा एक भाग असतो. पाहुण्याला बाकरवड्या योग्य वेळेत मिळवून देणं, हाही काही वेळा अस्मितेचा प्रश्न ठरू शकतो. कारण मानबिंदू वगैरे असला, तरी तो ठराविक वेळेत मिळणार, ठराविक दिवशी मिळणार नाही, हे पुण्याचं वैशिष्ट्य जपणं, हाच स्वाभिमान असतो. काही पदार्थ ठराविक ठिकाणी, ठराविक दुकानात खाणं इष्ट असतं. त्याबाबतीत प्रयोग करता येत नाहीत आणि त्यातून अनेकदा निराशाच पदरी पडते. मात्र, हे पदार्थ घरी करून बघितले, तरी त्याचा अनुभव रंजक ठरू शकतो. मिसळीचा तर्रीबाज रस्सा हा कळकट हॉटेलातच ओरपायचा प्रकार असला, तरी घरचा प्रयोगही अगदीच वाईट होत नाही. बाकरवडीचंही तसंच आहे. कुठलाही पदार्थ करताना त्यातलं प्रमाण मस्त जमावं लागतं आणि तो पदार्थ करण्याचा आनंद घ्यावा लागतो. तेवढी काळजी घेतली, की उत्तम बाकरवड्या तयार झाल्याच! फक्त मैदा, बेसन असे पदार्थ मर्यादित प्रमाणात खाल्ले, तर ते आरोग्यालाही चांगलं असतं. त्यामुळे घरी किंवा बाहेर बाकरवड्या किती हादडायच्या, हे ज्याचं त्यानं ठरवायचं!

Amar Singh Chamkila show fee
८० च्या दशकात एका शोसाठी किती मानधन घ्यायचे अमरसिंग चमकीला? रक्कम ऐकून चकित व्हाल
chatura article on small kid, chatura parent article
समुपदेशन : मुलांच्या जगातून पालक हरवतात?
Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • २ कप मैदा
  • २-३ मोठे चमचे बेसन
  • चवीपुरते मीठ
  • १ ते दीड चमचा तेल
  • १ छोटा चमचा ओवा
  • सारणासाठी
  • १ मोठा चमचा बेसन
  • १ छोटा चमचा तीळ आणि खसखस
  • १ छोटा चमचा आले किसून
  • १ ते दीड चमचा लसूण पेस्ट
  • ३ चमचे लाल तिखट
  • १ ते दीड चमचा पिठीसाखर
  • १ छोटा चमचा गरम मसाला
  • १ चमचा धनेपूड
  • १ छोटा चमचा बडीशेप
  • १ चमचा किसलेले सुकेखोबरे
  • ३-४ मोठे चमचे बारीक शेव
  • मीठ

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • मैदा आणि बेसन एकत्र करून त्यात मीठ आणि ओवा घालावा. तेल गरम करून पीठात घालावे आणि पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. आणि झाकून १५-२० मिनिटे बाजूला ठेवावे.
  • तीळ आणि खसखस तव्यावर थोडी भाजून घ्यावी.
  • सारणासाठी दिलेले सर्व पदार्थ, तीळ, खसखस एकत्र करून १ चमचा तेलावर थोडे परतून घ्यावे.
  • सारण तयार झाल्यावर भिजवलेल्या मैद्याची एक पातळ पोळी करून १-२ चमचे सारण त्यावर समान पसरावे.आणि घट्ट रोल करावा.. (जर रोल घट्ट नाही झाला तर त्यातील सारण बाहेर येते.)
  • सुरीने १ इंच आकाराचे तुकडे करावे.
  • गरम तेलामध्ये गोल्डन ब्राउन तळून घ्यावेत.
  • बाकरवडया थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवाव्यात.

[/one_third]

[/row]