तुम्हाला मासे खाणं आवडत असेल तर तुम्हाला फिश फ्राय नक्कीच आवडेल. ही फिश फ्रायची रेसिपी इतकी चवदार आहे, की एकदा खाऊन तुमचं मन अजिबातच भरणार नाही. मासे केवळ चविष्टच नाही तर पौष्टिकही असतात. मासे पचण्यासही हलके असतात. आहारतज्ञही मटण-चिकनच्या तुलनेत मासे खाण्यास सांगतात. चला तर मग आज पाहुयात ग्रिल्ड कोरिएन्डर गार्लिक फिशची रेसिपी. याची रेसिपी एकदमच सोपी आणि झटपट होणारी आहे.
ग्रिल्ड कोरिएन्डर गार्लिक फिश साहित्य
१. ५०० ग्राम पापलेटचे तुकडे
२. १-१/२ टेबलस्पून आले लसूण पेस्ट
३. १ टेबलस्पून कोकम आगळ
४. मीठ चवीनुसार
५. १/२ टीस्पून मिरे पूड
६. १/२ लिंबू रस
७. १ टेबलस्पून चिली फ्लेक्स
८. तेल
९. कोथिंबीर
ग्रिल्ड कोरिएन्डर गार्लिक फिश कृती
१. सर्वप्रथम पापलेटचे काप करून घ्यावेत मीठ लावून छान धुऊन घ्यावेत साता धुतलेल्या पापलेटच्या तुकड्यांना आले-लसूण पेस्ट लावावी चवीनुसार मीठ घालून घ्यावे.
२. बारीक केलेली मिरपूड घालून घ्यावी सोबतच लिंबाचा रस घालून घ्यावा कोकम आगळ असल्यास कोकम आगळ ही घालून घ्यावे कोकणा मुळे माशांना छान चव येते
३. सर्वात शेवटी चिली फ्लेक्स घालून घ्यावेत आणि आता वरील सर्व पदार्थ छान पैकी माशांना दोन्ही बाजूने लावून घ्यावे आणि हे मासे अर्धा तास साठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवावे नॉनस्टिक पॅन वरती हे माशाचे तुकडे किंवा ग्रील पॅन वरती हे माशाचे तुकडे दोन्ही बाजूनी छान शालो फ्राय करून घ्यावेत.
४. माशाचे तुकडे भाजत आले की बारीक चिरलेली कोथंबीर थोड्या बटर मध्ये कालवून माशांवर ती लावावी आणि पुन्हा माशाचे तुकडे छान पैकी दोन्ही बाजूनी भाजून घ्यावेत.
हेही वाचा >> “बोंबलाचे खेंगाट” गृहिणींनो ‘ही’ रेसिपी एकदा नक्की ट्राय करा; केस गळती होईल कायमची दूर
५. डाएट कॉन्शस लोकांनी हे तुकडे कमी तेलातच भाजावेत हे माशाचे तुकडे गरमागरम कोरडेच खायला छान लागतात किंवा तुम्ही तांदळाच्या भाकरी सोबत ही खाऊ शकता.
रेसिपी कुकपॅडवरुन साभार.