scorecardresearch

बटरवर भाजलेली खमंग दाबेली घरीच बनवा; सारण व मसाला कसा तयार करायचा? पाहा रेसिपी

Dabeli Recipe In Marathi: अगदी मोजक्या सामानात बनणारी ही दाबेली रेसिपी लोकसत्ता पूर्णब्रह्मच्या शेफकडून जाणून घेऊयात.. चला तर मग..

How To Make Dabeli At Home Marathi Recipe Dabeli Masala Step By Step Process Watch Here
खमंग दाबेली घरीच बनवा; सारण व मसाला कसा तयार करायचा? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

How To Make Dabeli At Home: वडापाव- पॅटिस, भजी असे आपणही घरी बनवू शकतो पण मस्त बटरवर भाजलेली खमंग दाबेली बनवायची म्हणजे नेमकी पद्धतच माहित नसते. अगदी म्हणावा तसा तिखटपणा नाही आणि अगदीच गोड साखरही नाही अगदी परफेक्ट मापात दाबेलीचे सारण बनवायचे तरी कसे हे आज आपण पाहणार आहोत. घरच्या घरी एखाद्या वीकेंडला सकाळी नाष्ट्यासाठी किंवा संध्याकाळी जेवणाला वेळ असताना लागलेली भूक मिटवण्यासाठी तुम्हीही ही रेसिपी करून पाहू शकता. अगदी मोजक्या सामानात बनणारी ही रेसिपी लोकसत्ता पूर्णब्रह्मच्या शेफकडून जाणून घेऊयात.. चला तर मग..

दाबेली मसाला करण्यासाठी साहित्य:

२- ३ सुक्या लाल मिरच्या, १ चमचा बडीशेप, १ चमचा धणे, १ चमचा जिरे, ३ लवंगा, १ इंच दालचिनीचा तुकडा

दाबेली सारणाचे साहित्य:

३- ४ उकडलेले बटाटे (कुस्करून घ्या) , आलं- लसूण पेस्ट, १ हिरवी मिरची बारीक चिरलेली, १ लिंबाचा रस, मीठ, साखर, हिरवी चटणी (कोथिंबीर- पुदिना- मिरची), चिंच- गूळ चटणी, डाळिंबाचे दाणे, ओलं खोबरं, नायलॉन शेव, तिखट शेंगदाणे, बटर किंवा तेल, पाव

हे ही वाचा<< Video: भाताचा लगदाही नको,कच्चाही नको! मोकळा फडफडीत भात बनवायच्या ‘या’ १० बेस्ट टिप्स पाहा

दाबेलीची रेसिपी (मराठी)

सर्वात आधी दाबेली मसाला करण्यासाठी घेतलेले साहित्य गरम पॅनवर मंद आचेवर भाजून घ्या. हे मसाले मिक्सरला वाटून घ्या. मग एका पॅनमध्ये तेल तापवून आलं-लसूण पेस्ट, चिरलेली मिरची, कुस्करलेले बटाटे, साखर, मीठ, लिंबाचा रस व किंचित पाणी घालून मऊ सारण तयार करा. पाव मधून कापून तेल किंवा बटर लावून अर्धे भाजून घ्या, यात एका बाजूला लसूण व एका बाजूला गोड चटणी लावा. पावाच्या एका बाजूला सारण लावून त्यावर डाळिंबाचे दाणे, शेव, तिखट दाणे, खोबरं, कोथिंबीर टाकून घ्या. पुन्हा एकदा तव्यावर थोडं बटर घालून हे सारण भरलेले पाव भाजून घ्या. गरमागरम दाबेली सर्व्ह करा.

हे ही वाचा<< पापलेट लोणचं चाखलंयत का? ‘या’ सोप्या रेसिपीने घरीच बनवा आचारी मच्छी टिक्का

ही रेसिपी आपणही नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली नक्की कळवा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी लोकसत्ताला फॉलो करायला विसरू नका.

मराठीतील सर्व रेसिपी ( Recipes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 19:20 IST