How to make puri in water : आज काल लोकांना निरोगी आरोग्याचे महत्त्व लक्षात येत आहे त्यामुळे दिवसें दिवस चांगल्या गोष्टींकडे वळत आहे. व्यायाम करत आहे. निरोगी आहार घेत आहे. गोड, तेलकट पदार्थांचे सेवन कमी खाण्यावर भर देत आहे पण अनेकदा आपल्याकडील चविष्ट खाद्यपदार्थां खाण्याच्या इच्छा त्यांच्या सर्व मेहनतीवर पाणी फिरवते कारण हे पदार्थ तेलकट असतात. तुमच्यासह देखील असेच होते का? तुम्हालाही जर हेल्दी पण टेस्ट पदार्थ खायचे असतील एक पदार्थ तुम्ह नक्की खाऊ शकता. तो म्हणजे पुरी. तुम्ही म्हणाल पुरी हेल्दी कशी काय असेल तर पुरी तर तेलकट असते तेलामध्ये तळली जाते. पण तीच तर गमंत आहे की पुरी तेलामध्ये तळायची नाही. पुरी तेलामध्ये न तळता देखील तयार करता येते. होय, तुम्हाला विश्वास बसत नसेल तर हा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहा.

इंस्टाग्रामवर nehadeepakshah नावाच्या पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये चक्क पाण्यात पुरी बनवल्याचे दाखवले आहे. तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना, हे कसे शक्य आहे. चला तर मग जाणून घेऊ या.

व्हायरल व्हिडीओनुसार एका भांड्यात १ कप गव्हाचे पीठ, १/४ टीस्पून मीठ, १ आणि १/२ चमचा दही टाका आणि त्यात गरजेनुसार पाणी टाकून पुरीसाठी कणीक मळून घ्या. पीठ किंचित घट्ट असल्याची खात्री करा. पुरी परफेक्ट दिसण्यासाठी दही महत्त्वाची भूमिका बजावते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एअर फ्रायरच्या तापमान ४ मिनिटांसाठी १९० अंशवर सेट करा आणि एअर फ्रायर प्री-हीट करून घ्या. तयार पीठाची पुरी लाटून घ्या. पुरी उकळत्या पाण्यात तरंगत नाही तोपर्यंत शिजवा. जेमतेम २ ते ३ मिनिटे शिजू द्या. एअर फ्रायरमध्ये घालण्यापूर्वी पुरी थोड्या सुकण्यासाठी ठेवा. एका कापडाने सून घ्या. पुऱ्या जास्त शिजवू नका. एअर फ्रायर नेहमी आधीपासून गरम करा. ५ ते ६ मिनिटे पुरेसे आहेत आणि तुम्ही दोन चार पुऱ्या एकत्र ठेवू शकता, फक्त एकावर एक ठेवू नका. गरम गरम टम्म फुगलेली तेला शिवाय बनवलेली पुरी तयार आहे.