सॅलडचा आहारात समावेश करावा, असा सल्ला आहारतज्ञ नेहमी देतात. नेहमी नेहमी तेच ते सॅलड खाऊन कंटाळले असाल तर तु्म्ही राजमा सॅलड ट्राय करू शकता. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी राजमा फायदेशीर असल्याचे मानले जाते. आज आम्ही तुम्हाला हेल्दी राजमा सॅलड कसे बनवायचे, याविषयी जाणून घेऊया.
साहित्य
- राजमा एक ते दीड मोठा चमचा
- कांदा १ लहान
- कापलेली सिमला मिरची १ मोठा चमचा
- मक्याचे दाणे २ चमचे
- भाजलेले दाणे एक चमचा
- चवीसाठी लाल तिखट
- मीठ
- लिंबू
- कोथिंबीर
हेही वाचा : उपवासाला असे बनवा टेस्टी बटाटा कबाब, जाणून घ्या ही सोपी रेसिपी
कृती
- राजमा आधल्या रात्री ८-१० तास पाण्यात भिजवत ठेवा.
- दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये व्यवस्थित शिजवून घ्या.
- एका भांड्यात शिजवलेला राजमा (पाणी निथळून) त्यात बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची घाला.
- मिश्रण एकत्र करा आणि त्यात मक्याचे दाणे, भाजके दाणे / दाण्याचे कूट घालून मिश्रण एकजीव करा.
- चवीसाठी त्यात लाल तिखट, लिंबाचा रस, मीठ, कोथिंबीर घालून मिश्रण हलवून घ्या.
- ५ मिनिटे झाकून ठेवा आणि मग वाढा आणि खा..
(टीप- राजमा सॅलड हे गरम अथवा फ्रिजमध्ये ठेवून कोल्ड सॅलडप्रमाणे खाता येते.)