पाणीपुरी कोणाला खायला आवडत नाही. क्वचितच असा व्यक्ती असेल ज्याला पाणीपुरी आवडत नाही. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना पाणीपुरी खायला आवडते. पाणीपुरी खायला केव्हाही तयार असतील असे अनेक लोक तुम्हाला भेटतील. अनेकदा लोक घरीच पाणीपुरी तयार करतात. कितीही पाणीपुरी खाल्ली तरी मन भरत नाही. पाणीपुरीमध्ये सहसा चिंचेचे पाणी वापरले जाते. पण आजकाल बाजारात विविध प्रकारच्या पाणी असेलेली पाणीपुरी मिळते. जिरा पाणी, पुदीना पाणी, डाळींबाचे पाणी, चिंच पाणी….असे विविध प्रकार पाहायला मिळतात. सध्या उन्हाळा सुरु आहे त्यामुळे बाजारात भरपूर कैऱ्या उपलब्ध आहेत. या उन्हाळ्यात तुम्ही एकदा कैरीची पाणीपुरी बनवू शकता. ही पाणीपुरी चवीला अगदी चटकदार लागते. तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग रेसिपी जाणून घेऊ या.
साहित्य
१कप कोथिंबीर पाने
१/४ कप पुदिन्याची पाने
१/२ कप चिरलेला कच्चा आंबा
२-३ हिरव्या मिरच्या
अर्धा क्म चिंचेचे पाणी
१ इंच आल्याचा तुकडा
१ टीस्पून धने पावडर
१टीस्पून जिरे पावडर
१ टीस्पून काळे मीठ
१ टीस्पून आमचूर पावडर
१ टीस्पून साधे मीठ
१/२ टीस्पून लाल मिरची पावडर
१/४ टीस्पून हिंग
एका लिंबाची रस
१/१ कप आंब्याचे छोटे तुकडे
१/१ टीस्पून चाट मसाला –
मूठभर ताजी कोथिंबीर
रगड्यासाठी
उकडलेले बटाटे, लहान तुकडे करून त्यात थोडा चाट मसाला, तिखट आणि मीठ मिसळा.
पुरी: दुकानात विकत आणा.
हेही वाचा – शेफ विकास खन्ना यांचा आवडता कैरीचा ठेचा खाल्ला आहे का? नसेल तर एकदा खाऊन पाहा, ही घ्या रेसिपी
हेही वाचा – गरमा गरम कुरकुरीत कैरीची भजी, एकादा खाल तर खातच राहाल! पाहा हटके रेसिपी Video
कृती
सर्वप्रथम एका कैरीची साल काढून तिचे काप करून घ्या. मग मिक्सरच्या भांड्यात कैरीचे काप टाकून त्यात कोथिंबीर, पुदीना, चिंचेचे पाणी, आले-मिरची बर्फ टाकून पेस्ट करून घ्या. आता त्यात एक ग्लास पाणी ओता. त्यात तिखट, मीठ, जीरे-धने पावडर, आमचूर पावडर, काळे मीठ, हिंग आणि लिंबाचा थोडीशी पीठीसाखर टाका आणि मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या. कैरीचे पाणी तयार आहे. कैरीच्या पाणीपुरीचा मनसोक्त आस्वाद घेऊ शकता.