महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांमध्ये खूप विविधता आहे. महाराष्ट्रीय लोकांसह इतर राज्यातील लोकांनाही येथील खाद्यपदार्थ मनापासून आवडतात. मग तो वडापाव असो की झणझणीत ठेचा. मिरचीचा ठेचा तर तुम्ही हमखास खाल्ला असेल पण तुम्ही कधी कैरीचा ठेचा खाल्याय का? नसेल तर आता ट्राय करू शकता. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हा ठेचा प्रसिद्ध शेफ विकास खन्ना यांचा देखील आवडता महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. उन्हाळ्यामध्ये कैरी सहज बाजारात मिळतात.तुम्ही कैरीचे लोणचं, पन्हे, चटणी असे पदार्थ खाल्ले असतीलच पण आता झणझणीत आबंट कैरीचा ठेचा खाऊन पाहा. रेसिपी झटपट नोट करा.

कृती-
१/२ कच्चा आंबा (कैरी/केरी)
१०-१२ हिरव्या मिरच्या
१४-1१५ लसूण पाकळ्या
२ चमचे शेंगदाणे
२-३ चमचे धणे
चवीनुसार मीठ
फोडणीसाठी- तेल, चिमूटभर हिंग आणि १/२ टीस्पून हळद

कृती
गॅसवर एक तवा ठेवा. गरम झाल्यानंतर हिरव्या मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे तेलात भाजून घ्या

त्यानंतर कच्चा आंबा, मीठ आणि कोथिंबीर घालून खलबत्यामध्ये ठेचून घ्या.

त्यानंतर फोडणीसाठी एका भांड्यात तेल गरम करा त्यात चिमूटभर हिंग आणि हळद टाका आणि कैरीवर टाका.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुमचा स्वादिष्ठ ठेचा तयार आहे.