Sprouts Sandwich : लहान मुलांना सँडविच खूप आवडते पण नेहमी नेहमी बाहेरचे अनहेल्दी सँडविच मुलांना खाऊ घालणे, त्यांच्या आरोग्यासाठी चांगले नाही. अशात पालकांनी मुलांना घरीच पौष्टीक सँडविच बनवून खाऊ घालायला पाहिजे. जर तुम्हाला मुलांना हेल्दी आणि टेस्टी सँडविच खाऊ घालायचे असतील तर कडधान्याचे सँडविच हा एक उत्तम पर्याय आहे. हे सँडविच कसे बनवायचे? जाणून घेऊ या.

साहित्य

  • कडधान्ये (मुग, मटकी, हरभरे, वाटाणे)
  • ब्रेड स्लाईस
  • कांदे
  • चिरलेली कोथिंबीर
  • मिरची
  • उकळलेले बटाटे
  • चाट मसाला
  • काळं मीठ
  • लाल तिखट
  • पुदिना चटणी
  • बटर
  • मीठ

हेही वाचा : Pani Puri : पावसाळ्यात बाहेरची पाणी पुरी खाऊ नका; घरीच बनवा पाणी पुरी, ही सोपी रेसिपी नोट करा

कृती

कडधान्ये चांगले वाफवून घ्या
गरम असतानाच मिक्सरमध्ये थोडे बारीक करा
त्यात चाट मसाला, काळं मीठ, लाल तिखट आणि कोथिंबीर घालून मिक्स करा.
चवीनुसार मीठ घाला.
ब्रेडला बटर आणि चटणी लावावी.
त्यावर कडधान्याचे मिश्रण लावावे.
त्यावर उकळलेले बटाट्याच्या आणि कांद्याच्या चकत्या ठेवा आणि त्यावर दुसरा ब्रेड स्लाईस लावा.
तव्यावर थोडं तेल टाकून दोन्ही बाजूने सॅंडविच भाजून घ्या.
कोणत्याही चटणीबरोबर तुम्ही हे सँडविच खाऊ शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.