scorecardresearch

Premium

Kohlyache Bond : विदर्भातील पारंपारिक कोहळ्याचे बोंड, जाणून घ्या ही हटके रेसिपी

अनेकांना या रेसिपी विषयी माहिती नसेल कारण ही रेसिपी सहसा विदर्भात बनवली जाते. विदर्भातील पारंपारिक कोहळ्यांची बोंडं कशी बनवावी, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

Kohlyache Bond
विदर्भातील पारंपारिक कोहळ्याचे बोंड (Photo : Instagram)

Kohlyache Bond Recipe : कोहळं म्हणजे भोपळा. विदर्भात भोपळ्याला कोहळं म्हणतात. या कोहळ्यापासून तुम्ही खास गोड बोंड करू शकता. अनेकांना या रेसिपी विषयी माहिती नसेल कारण ही रेसिपी सहसा विदर्भात बनवली जाते. विदर्भातील पारंपारिक कोहळ्याची बोंडं कशी बनवावी, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

साहित्य

 • कोहळं
 • साखर
 • गव्हाचं पीठ
 • मीठ
 • वेलची पूड
 • खसखस
 • मीठ
 • तेल

हेही वाचा : Jeera Rice : दहा मिनिटांमध्ये असा बनवा हॉटेलसारखा जिरा राईस, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

ambadichi bhaji recipe in marathi bhaji recipe in marathi
गावाकडील पारंपरिक पोटली पद्धतीची चविष्ट अंबाडीची भाजी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
damage forests
उद्योगांवर कृपादृष्टी… सामान्यांवर वक्रदृष्टी!
Vidarbha special recipes dal kanda recipe in marathi
विदर्भाची खासियत म्हणजे चमचमीत तर्रीदार “डाळ कांदा”; वाचा सोपी रेसिपी
MPSC Preparation Ethics in Public Administration
MPSC ची तयारी: लोक प्रशासनातील नैतिकता (भाग-२)

कृती

 • एक कोहळं घ्या आणि त्याची साल काढून घ्या
 • त्यानंतर या कोहळ्याच्या फोडी कापून घ्या
 • फोडीमध्ये पाणी घालून चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत कुकरमध्ये कोहळयाच्या फोडी चांगल्याने शिजून घ्या.
 • कोहळ्याच्या फोडी शिजल्यानंतर त्यात साखर घालून कमी आचेवर शिजवून घ्या.
 • मिश्रण थंड होऊ द्या.त्यानंतर खसखस, वेलची पूड टाका.
 • त्यानंतर गव्हाचं पीठ या मिश्रणात एकत्र करा.
 • त्यात चवीनुसार मीठ घाला. सर्व मिश्रण एकजीव करा.
 • कढईत तेल गरम करा आणि गरम तेलातून बोडं तळून घ्या.
 • कमी आचेवर बोडं तळून घ्या.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kohlyache bond recipe how to make kohlyache bond vidarbha special recipe ndj

First published on: 23-11-2023 at 12:14 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×