कोकणातील खाद्य संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल आहे, कोकणातील अस्सल पारंपारिक गोड पदार्थ आजही कोकणातील घरांमध्ये सणासुदीला हमखास खायला मिळतात. असाच एक कोकणातील अस्सल पारंपारिक गोड पदार्थ आज आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. या पादर्थाचं नाव आहे, मोकल. याची रेसिपी काय आहे, पदार्थ कसा बनवायचा चला जाणून घेऊयात.
मोकल साहित्य :
- थालीपीठाची भाजणी चार वाट्या
- कांदे चार-पाच
- दोन चमचे तिखट
- चवीपुरतं मीठ
- तेल
- अर्धा चमचा ओवा
- हळद, हिंग चवीप्रमाणे
- एक वाटी खवलेलं ओलं खोबरं
- अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
- पाव वाटी दही किंवा आंबट ताक.
मोकल कृती :
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
- प्रथम कांदे बारीक चिरुन घ्या, परातीत थालीपीठाची भाजणी घालून थोडं पाणी घालून भाजणी ओली करा.
- जास्त पाणी घालू नये, फक्त भिजण्याएढी घाला. त्यानंतर तेल कडकडीत तापल्यावर राई, हिंग, हळद घालून खमंग फोडणी तयार करा.
- मग त्यात कांदा परतून घ्या. कांदा शिजला की त्यात मीठ घाला आणि नंतर भिजवलेली भाजणी घाला, झाकण ठेवून वाफ द्या.
हेही वाचा >> “चटपटीत खानदेशी कढी” कमी साहित्याची महाराष्ट्रीयन दही कढी नक्की ट्राय करा…
- त्यानंतर ताकाचा हबका मारुन परत झाकण ठेवून परता, ताक घातल्यामुळे त्याला आंबटसर चव येते व खायलाही छान लागते.