दुधी भोपळा हा अत्यंत पौष्टिक मानला जातो पण बऱ्याच जणांना तो आवडत नाही तर काहींना नेहमीची दुधी भोपळ्याची भाजी आणि दुधीचा हलवा खाऊन कंटाळा येतो. म्हणूनच तुमच्यासाठी दूधी भोपळ्याची एक हटके रेसिपी सांगणार आहोत. तुम्हाला तर थालपीठ आवडत असेल तर ही रेसिपी नक्कीच आवडेल.हमीच्या थालपीठाच्या भाजणीमध्ये दुधी भोपळा वापरल्यास तुम्ही पौष्टिक थालपीठ बनवू शकता. ज्यांना रोज रोज पोहे- शिरा उपीच नाश्ता खाऊन कंटाळा आला आहे त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. लहान मुलांच्या डब्यासाठी देखील चांगला पर्याय आहे. तसेच तुम्ही आरोग्याची काळजी घेत असाल तरी तुमच्यासाठी हा एक पौष्टिक आहाराचा पर्याय ठरू शकता. दुधीच्या थालपीठ चवीला देखील अप्रतिम लागते. तुम्हाला नक्की आवडेल. मग वाट कसली पाहत आहात झटपट रेसिपी नोट करा.

वापरलेले साहित्य:

थालपीठाची भाजणी साहित्य
ज्वारीचे पीठ – १ वाटी
बेसन – १/२ कप
बाजरीचे पीठ – १/२ कप
संपूर्ण गव्हाचे पीठ – १/ ४कप
तांदूळ पीठ – १/४ कप
जर तुमच्याकडे हे पीठ नसेल तर तुम्ही थालीपीठ मिक्स तुमच्या स्थानिक पिठाच्या गिरणीतून किंवा ऑनलाइन सहज खरेदी करू शकता.

दूधीचे थालपीठासाठी साहित्य

किसलेली दूधी,
चिरलेला कांदा,
हिरवी मिरची
लसूण कढीपत्त्याची पेस्ट
चिरलेली कोथिंबीर,
तीळ,
हळद,
धनेपूड,
मीठ,
तेल
पाणी.

कृती

प्रथम एका खलबत्यामध्ये मिरची,कढीपत्ता, लसून मीठ टाकून चांगली वाटून घ्या. एका ताटात ज्वारीचे पीठ १ वाटी, बेसन – १/२ कप, बाजरीचे पीठ – १/२ कप, संपूर्ण गव्हाचे पीठ – १/ ४कप, तांदूळ पीठ – १/४ कप घ्यात. आता त्यामध्ये किसलेला दूधी, चिरलेला कांदा, हिरवी मिरची लसूण कढीपत्त्याची पेस्ट चिरलेली कोथिंबीर, तीळ, हळद, धनेपूड,
मीठ, तेल आणि थोडे पाणी टाकून चांगली मळून घ्या.
गॅसवर तवा तापण्यासाठी ठेवा. एक ओले कापड घेऊ त्यावर थालपीठ थापून घ्या. रुमालासह थालपीठ तव्यावर टाका. त्यानंतर रुमाल हळूच काढून घ्या. दोन्ही बाजूने थालपीठ खरपूस भाजून घ्या. गरम गरम दही किंवा कडधान्याच्या उसळीबरोबर खा.