Ragi Appe Recipe: उन्हाळ्याच्या दिवसात मुलांसाठी दररोज काय बनवायचं? हा प्रश्न अनेक महिलांना सतावतो. नवीन पदार्थासोबतच मुलांसाठी तो पौष्टिक असणं देखील खूप गरेजचं आहे. अशावेळी तुम्ही नाचणीचे आप्पे ट्राय करु शकता. नाचणीत कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसिन, थायमिन, रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषकद्रव्ये असतात. शिवाय यामुळे अशक्तपणादेखील दूर होण्यास मदत होते. शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असल्यासदेखील नाचणीचे पदार्थ खाणं फायदेशीर आहे.
नाचणीचे आप्पे बनवण्यासाठी साहित्य :
१. २ वाटी उडीद डाळ ( ४-५ तास भिजलेली)
२. २ वाटी नाचणी पीठ
३. २ वाटी बेसन
४. ६-७ हिरव्या मिरच्या
५. ५-६ लसूण पाकळ्या
६. १ वाटी किसलेले गाजर आणि बीट
७. मीठ चवीनुसार
८. कोथिंबीर
नाचणीचे आप्पे बनवण्याची कृती :
हेही वाचा: मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात अशी बनवा ज्वारीची हेल्दी इडली; नोट करा साहित्य अन् कृती
१. सर्वात आधी भिजवलेली उडीद डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यानंतर त्यात नाचणीचे आणि बेसन पीठ घालून व्यवस्थित फेटून घ्या.
२. त्यानंतर त्यात मीठ घालून पीठ रात्रभर आंबवायला ठेवा.
३. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पीठामध्ये मिरची-लसूण-कोथिंबीरचे वाटण आणि किसलेले गाजर, बीट मिक्स करा.
४. आता आप्पे पात्राच्या आतल्या बाजूला तेल लावून त्यात आप्प्याचे मिश्रण घाला आणि ते दोन्ही बाजूने लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
५. तयार गरमागरम आप्पे नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा.