Bread Paratha Recipe : अनेकदा नाश्त्यासाठी आणलेले ब्रेड उरतात, अशावेळी त्यांचं काय करायचं? हा प्रश्न तुम्हालाही पडत असेलच. अशावेळी तुम्ही त्या ब्रेडपासून वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करू शकता. आत्तापर्यंत अनेकदा तुम्ही उरलेल्या ब्रेडपासून गुलाबजाम, उपमा असं काहीना काही बनवलं असेलच. पण, आज आम्ही तुम्हाला ब्रेड पराठा कसा बनवायचा हे सांगणार आहोत. जाणून घेऊया साहित्य आणि कृती.

ब्रेड पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • ७-८ ब्रेड स्लाइस
  • गव्हाचे पीठ
  • ३ बटाटे (उकडलेले)
  • २ कांदे (बारीक चिरलेले)
  • ४-५ हिरव्या मिरच्या
  • १ चमचा आलं-लसूण पेस्ट
  • १ चमचा लाल तिखट
  • १ चमचा हळद
  • १ चमचा गरम मसाला
  • चवीनुसार मीठ
  • कोथिंबीर
  • तूप गरजेनुसार

ब्रेड पराठा बनवण्याची कृती:

हेही वाचा: मटार कटलेटची झटपट होणारी सोपी रेसिपी नक्की ट्राय करा; पटकन वाचा साहित्य आणि कृती

soya chunks balls recipe in marathi
उद्याच्या नाश्त्यासाठी बनवा चवदार ‘सोया चंक्स बाॅल्स’, झटपट होणारी रेसिपी लिहून घ्या…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
bhakri
भाकरी थापताना नेहमी मोडते, भाजताना चिरते का? टेन्शन घेऊ नका; टम्म फुगलेली मऊसूत ज्वारीची भाकरी बनवा, फक्त या सोप्या टिप्स वापरून पाहा
How to make paratha
प्रत्येक वेळी पराठे लाटताना फुटतात? मग ट्राय करून बघा ‘या’ टिप्स…
Boondi curry recipe in Marathi how to make Boondi curry recipe
रोज काय भाजी करावी सुचत नाही? घरात असलेल्या बुंदीची करा “बूंदी करी”; झक्कास होईल बेत
Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
way of chopping and cleaning methi leaves
मेथीची भाजी खायला आवडते; पण साफ करायचा कंटाळा येतो? मग ‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने भाजी चुटकीसरशी करा साफ
Fried Modak Recipe
Modak Recipe : माघी गणेश जयंतीला फक्त १ वाटी गव्हाच्या पिठाचे बनवा कुरकुरीत ‘मोदक’; रेसिपी वाचा पटकन
  • सर्वप्रथम एका भांड्यामध्ये उकडलेले बटाटे घ्या.
  • त्यामध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला, कांदा, हिरव्या मिरच्या, आलं-लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि मीठ हे सर्व घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करा.
  • त्यानंतर ब्रेड स्लाइसच्या बाजूचे काढ कापून घ्या.
  • आता प्रत्येक ब्रेड अलगद पाण्यात बुडवून लगेच बाहेर काढा आणि त्यातील पाणी हाताने दाबून काढा.
  • आता गव्हाचे पीठ मळून त्याचा गोळा तयार करून घ्या.
  • त्यामध्ये ब्रेडचा तुकडा ठेवा आणि तयार केलेले आलू स्टफिंग यामध्ये घालून हे व्यवस्थित बंद करा.
  • तयार स्टिफिंग पराठा लाटून तव्यावर तूप लावून खरपूस भाजून घ्या.
  • गरमागरम ब्रेड पराठा सॉसबरोबर सर्व्ह करा.

Story img Loader