Margashirsha Guruvar Naivedya: मार्गशिष महिन्याच्या गुरूवारी अनेकजणी महालक्ष्मीचे उपवास करतात. काहींना उपवास करणं जमत नाही. पण देवासमोर नैवेद्य ठेवण्यासाठी काहीतरी गोड पदार्थ तयार केला जातो. एकादशीच्या उपवास झाला आता परत गुरुवारचा उपवास म्हणजे साबुदाण्याची खिचडी नको वाटत असेल ना? चला तर मग घरच्या घरी पटकन तयार होणारी नैवेद्य रेसेपी पाहूयात. आज आपण मार्गशीष गुरुवारच्या उपवास सोडण्यसाठी मेथीचे वरण केस करायचे हे पाहणार आहोत.
मेथीचे वरण साहित्य
- मेथी
- मूग डाळ, मसूर डाळ
- लसणाच्या पाकळ्या
- गुळ पावडर, आमसूल
- बेसन, लाल तिखट
- गोडा मसाला, गुळ पावडर
- आमसूल, मोहरी
- हिंग, हळद
- लाल सुकी मिरची, मीठ
मेथीचे वरण कृती
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
- सर्वप्रथम, मेथीची पानं धुवून बारीक चिरून घ्या. नंतर एका भांड्यात ,मूग डाळ आणि मसूर डाळ समप्रमाणात घेऊन शिजत ठेवा.
- कढईत एक चमचा तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. नंतर त्यात बारीक चिरलेली मेथी घालून परतवून घ्या. नंतर त्यात चवीनुसार मीठ घाला. कारण मिठामुळे भाजीचा रंग बदलत नाही. तो तसाच हिरवा राहतो.
- नंतर मूग डाळ आणि मसूर डाळीच्या वरणात २ चमचे बेसन घालून मिक्स करा. भाजी थोडी शिजली की त्यात एक कप पाणी घाला.
- नंतर त्यात एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गोडा मसाला, अर्धा चमचा गुळ पावडर आणि आमसूल घालून मिक्स करा.
- भाजी शिजली की त्यात वरण आणि बेसनाचं बॅटर घालून मिक्स करा.
- फोडणीच्या पळीत २ चमचे तेल घाला. नंतर त्यात बारीक चिरलेला लसूण, एक चमचा मोहरी, अर्धा चमचा हिंग, एक चमचा हळद, एक लाल सुकी मिरची घालून मिक्स करा.
हेही वाचा >>
- तयार चुरचुरीत फोडणी मेथीच्या भाजीमध्ये ओतून मिक्स करा. अशा प्रकारे वरणातली मेथीची भाजी खाण्यासाठी रेडी.