Matar Idli Recipe In Marathi: इडली हे साऊथ इंडियन फूड असलं तरीही जवळजवळ प्रत्येक भारतीय घरात आवडीने खाल्ल जातं. चवीने आणि पौष्टिकतेने परिपूर्ण असण्यासोबतच, इडली ही एक रेसिपी आहे जी कमी वेळात झटपट तयार करता येते. पण तुम्ही कधी मटार इडली खाल्लीय का? म्हणूनच आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट मटार इडली कशी बनवायची हे सांगणार आहोत. ही इडली चवीला अप्रतिम आणि हेल्दी असणार आहे. जर तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी असेल, तर तुम्ही चिंता न करता तुमच्या नाश्त्यामध्ये या इडलीचा समावेश करू शकता.

साहित्य

  • 1 कप मटार दाणे
  • 1 कप बारीक रवा
  • 3/4 कप दही (दही आंबट नसल्यास १ कप घालावे)
  • 3 टेबलस्पून वाटण्यासाठी पाणी + (गरज पडल्यास फेटण्यासाठी)
  • 2-3 हिरव्या मिरच्या
  • 3/4 इंच आलं
  • मीठ चवीनुसार
  • फोडणी साठी….
  • १ टेबलस्पून तेल
  • 1 टिस्पून मोहरी
  • 1 टिस्पून उडदाची डाळ
  • १०-१५ कढीपत्त्याची पाने
  • मीठ चवीनुसार
  • 2 पींच हिंग

कृती

प्रथम मटार, हिरवी मिरची, आलं स्वच्छ धुवून त्यात तीन टेबलस्पून पाणी घालून मिक्सरवर वाटून घेतले.

ते मिश्रण एका वाडग्यात काढून त्यात बारीक रवा व फेटलेले दही, मीठ मिक्स करून घेतले.

आता हे मिश्रण गरजेनुसार पाणी घालून फेटून घेतले व पंधरा मिनिट झाकून ठेवले. आणि आणि एका छोट्या कढईमध्ये तेल मोहरी, उडदाची डाळ, हिंग व कडीपत्ता यांची फोडणी करून ती पण वरील मिश्रणात घातली.

गॅसवर इडली पात्रात पाणी गरम करत ठेवले. आता इडली करतेवेळी त्यात इनो व त्यावर एक चमचा कोमट पाणी घालून बॅटर हलक्या हाताने मिक्स करून घेतले व ग्रीसिंग केलेल्या इडली स्टॅण्ड मधे घालून तो स्टॅन्ड इडली पात्रात ठेवून इडल्या करून घेतल्या.

तयार इडल्या डिशमध्ये काढून चटणी बरोबर सर्व्ह केल्या. या हेल्दी तर आहेच पण झटपटही होतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.