Matar Pohe Recipe In Marathi: दररोज नाश्त्यासाठी अनेकदा काय बनवावं ते कळत नाही. अनेकदा तेच तेच खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो. आणि रोज नवीन काय बनवायचं हाच प्रश्न पडतो. म्हणून तुम्ही घरच्या घरी एक रेसिपी ट्राय करू शकता, जी झटपटही होते आणि चवदार आहे. आपण नेहमी कांदे पोहे खातोच पण आज आपण मटार पोहे कसे बनवायचे ते जाणून घेणार आहोत. चला तर मग, जाणून घेऊ या ‘मटार पोहे’ घरच्या घरी कसे बनवायचे…

साहित्य

  • 2 कप जाडे पोहे
  • 3 कांदे
  • 1/2 कप मटार
  • 2 हिरवी मिरची
  • 7/8 कडीपत्ता
  • कोथिंबीर
  • 1 टी स्पून राई
  • 1/2 टी स्पून हळद
  • चवी नुसार मीठ व साखर
  • ओले खोबरं चवी नुसार
  • 1/4 टी स्पून हिंग
  • लिंबू रस
  • 4 टेबल स्पून तेल

कृती

प्रथम पोहे स्वच्छ निवडून धुवून घ्यावे.

कांदा,हिरवी मिरची, कोथिंबीर चिरून घेणे.

पातेले गॅसवर गरम करून त्यात तेल घालावे. त्यात राई कडीपत्ता मिरची हिंग हळद घालून फोडणी करावी. त्यावर कांदा घालावा व मीठ घालून छान हलवावे. आता त्यात मटार घालून वाफेवर शिजवून घ्यावे.

मटार शिजले की त्यात पोहे घालून हलवावे. झाकण घालून शिजू द्यावे. नंतर थोडा लिंबू रस व साखर घालावी. कोथिंबीर व खोबरे घालून सर्व्ह करावे.

चला तर आपले कांदा पोहे मटार घालून तयार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नोट- ही रेसिपी कुकपॅडवरून घेण्यात आली आहे.