Paneer manchurian recipe जेव्हाही चायनीज पदार्थांचा उल्लेख केला जातो तेव्हा पहिले नाव मनात येते ते म्हणजे नूडल्स आणि मंचुरियन. तुम्हाला चायनीज फूडही आवडेल. आज आम्ही तुम्हाला मंचुरियन पण वेगळ्या स्टाईलमध्ये कसे बनवायचे ते सांगत आहोत. मंचुरियन हा पदार्थ मुले आणि प्रौढ दोघांनाही आवडते. किटी पार्ट्या, गेम नाईट आणि बाकी कोणत्याची प्रोगॅम यांसारख्या प्रसंगी तुम्ही ही फ्युजन रेसिपी नक्कीच ट्राय पाहू शकता. चला तर मग ड्राय पनीर मंचूरियन रेसिपी कशी बनवायची पाहूयात.

ड्राय पनीर मंचूरियन साहित्य

२५० ग्रॅम पनीर चौकोनी तुकड्यांमध्ये कापून घ्या

३ टेबलस्पून कॉर्न फ्लोअर

१ टेबलस्पून मैदा

१ शि मला मिरची

१ कांदा

१/४ कप हिरवा कांदा

३ हिरवी मिरची

१ टेबलस्पून आले लसूण पेस्ट

२ टेबलस्पून टोमॅटो सॉस

२ टेबलस्पून सोया सॉस

२ टेबलस्पून ग्रीन चिली सॉस

तेल तळण्यासाठी

मीठ चवीनुसार

पाणी आवश्यकतेनुसार

ड्राय पनीर मंचूरियन कृती

१. ड्राय पनीर मंचूरियन बनवण्यासठी सर्वप्रथम एका बाऊल मध्ये कॉर्न फ्लोअर, मैदा, अर्धा टेबलस्पून आले लसूण पेस्ट, मीठ घ्या. आता त्यात आवश्यकतेनुसार पाणी टाकून त्याचे घट्ट बॅटर तयार करा.

२. आता या बॅटरमध्ये पनीरचे तुकडे मॅरिनेट करून १५ ते २० मिनीटे बाजूला ठेवा.

३. नंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मॅरिनेट केलेले पनीरचे तुकडे त्यात टाका आणि सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळून घ्या.

४. तुम्हाला डीप फ्राय नको असेल तर तुम्ही ते कमी तेलात शॅलो फ्राय सुद्धा करू शकता.

५. आता शिमला मिरची, कांदा, हिरवा कांदा, हिरवी मिरची हे नीट बारीक कापून घ्या. पनीर तळल्यानंतर उरलेल्या तेलात आले लसून पेस्ट टाका.

६. नंतर त्यात शिमला मिरची, कांदा, हिरवी मिरची टाकून मिक्स करा. आता यात बाकीचे मसाले आणि सर्व सॉस टाकून मिक्स करा.

हेही वाचा >> Quick Breakfast Recipes : नाश्त्याला बनवा हेल्दी आटा चिला; झटपट अन् सोपी मराठी रेसिपी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

७. त्यानंतर त्यात तळलेले पनीरचे तुकडे टाका. हे नीट मिक्स करून घ्या आणि साधारण २ ते ३ मिनीटं ते शिजू द्या. हिरव्या कांद्याने गार्निश करून गरमा गरम सर्व्ह करा.