डॉ. सारिका सातव साहित्य * मूगदाळ- २ वाटी * चिरलेली कोथिंबीर- पाव वाटी * हिंग- १ चिमूट * मिरे, धने- प्रत्येकी एक छोटा चमचा * आले- अर्धा इंच ल्ल हिरवी मिरची- १ ते २ * मीठ आवश्यकतेनुसार ल्ल तेल कृती * मूगदाळ रात्री भिजत घालावी. * भिजलेली मूगडाळ पाणी निथळून मिरची, आले, हिंग टाकून वाटून घ्यावी. * घट्टसर मिश्रण तयार करून चवीनुसार मीठ टाकावे. * मिरे, धने जाडसर वाटून त्यात मिसळावे. * कोथिंबीर मिसळून मिश्रण व्यवस्थित एकत्र करावे. * तेल तापवून या मिश्रणापासून भजी तयार कराव्यात. * कोथिंबीर चटणी/ चिंचेच्या चटणीबरोबर गरम गरम खाण्यास द्याव्यात. वैशिष्टय़े * चवीस उत्तम. पचनाच्या तक्रारी येत नाहीत. * डब्याला नेण्यासाठी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम * विविध भाज्या टाकल्या तर अधिक रूचकर बनतो. * कॅल्शिअम, आयर्न, तंतुमय पदार्थ, कबरेदके आणि प्रथिने यातून मिळतात.