दीपा पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य

५०० ग्रॅम मटण, १०-१२ लाल सुक्या मिरच्या, १ चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, ७-८ काळी मिरी, लसूण, आले, २ मोठे चमचे ब्राऊन व्हिनेगर, १ मोठा कांदा (बारीक चिरलेला), मीठ.

कृती

सर्वप्रथम मटण स्वच्छ धुऊन घ्यावे. त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकावे. एका भांडय़ात जिरे, लाल मिरच्या, काळी मिरी परतून घ्यावे. यानंतर त्यात लसूण, आले, व्हिनेगार, मीठ घालून बारीक पेस्ट बनवावी. ही पेस्ट मटणाला लावून २ तास मुरत ठेवावे. आता कुकरमध्ये तेल गरम करा. त्यात हे मुरवलेले मटण परतावे.

त्यात पाणी घालून त्याच्या २-३ शिट्टय़ा काढाव्या. यानंतर गॅस बंद करून अर्धा तास तसेच ठेवावे. नंतर एका बाऊलमध्ये काढून त्यावर कोथिंबीर पेरून गरमागरम भातासोबत फस्त करा.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mutton vindaloo recipe loksatta readers
First published on: 24-04-2019 at 03:28 IST