Makhana Dosa Recipe : मखानापासून तयार केलेला उत्तपा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. उत्तपाचे अनेक प्रकार खूप प्रसिद्ध आहेत. जर तुम्हालाही उत्तपा खायला आवडत असेल तर यावेळी तुम्ही पौष्टिकतेने समृद्ध मखाना उत्तपा खाऊन पाहा. मखानामध्ये भरपूर पोषक तत्वे असतात आणि याच्या सेवनाने खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. याचसह मखानाचे सेवन रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासही उपयुक्त ठरते. मखाना उत्तपा नाश्त्यात किंवा दिवसभरात हलकी भूक लागल्यास तयार करून खाऊ शकतो. हा अतिशय चवदार आणि आरोग्यदायी खाद्यपदार्थ आहे.

जर तुम्हाला मुलांना सकस आहार खायला द्यायचा असेल तर तुम्ही त्यांच्या जेवणाच्या डब्यात मखाना डोसाही ठेवू शकता. मखाना उत्तपा बनवायला जास्त वेळ लागत नाही. जर तुम्हीमखाना उत्तपाची रेसिपी कधीच ट्राय केली नसेल तर तुम्ही दिलेल्या रेसिपीच्या मदतीने अगदी सहज बनवू शकता.

मखाना उत्तपा रेसिपी

मखाना – १ कप
पोहे – १/२ कप
रवा – १ कप
दही – १ कप
एनो – १ टीस्पून
पाणी –
मीठ –
बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो
कोथिंबीर

हेही वाचा – तुम्ही कधी चटकदार कैरीची डाळ खाल्ली आहे का? नसेल तर ही घ्या सोपी रेसिपी

हेही वाचा – बटाट्याचे काप नेहमी खाता, एकदा मुळ्याचे काप खाऊन तर पाहा, नोट करा सोपी रेसिपी
कृती

एका भांड्यात मखाना एक कप घ्या. त्यात अर्धा काप पोहे, एक कप रवा, एक कप दही, एक दही. एक टीस्पून दही, पाणी, मीठ, मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. गॅसवर तवा तापवून घ्या. त्यावत थोडे तेल टाका, त्यावर तयार पिठाचा उत्तपा तयार करा. त्याची जाळी दिसू लागली की त्यावर बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो आणि कोथिंबीरी टाकावी. हवी असल्यास कडीपत्ता चटणी टाकू शकता. गरम गरम उत्तपा, खोबरे किंवा शेंगदाण्याच्या चटणी सह खाऊ शकता. सांबर असेल तर उत्तम. मग वाट कसली पाहताय. ही रेसिपी सेव्ह करा आणि एकदा नक्की करून पाहा.