तुम्हाला दही भात आवडतो का? मग ही रेसिपी देखील तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला नाष्ट्यामध्ये वेगळे काहीतरी खाण्याची इच्छा असेल तर ही रेसिपी उत्तम पर्याय आहे. सहसा नाष्ट्याला पोहे-शिरा – उपीट केले जाते. पण यावेळी तुम्हाला पोह्याची थोडी वेगळी रेसिपी सांगणार आहोत. ही रेसिपी खायला अत्यंत चविष्ट आहे. उन्हाळ्यामध्ये थंडगार दही पोहे खाण्याची मज्जाच काही वेगळी आहे. विशेष म्हणजे हे दही पोहे झटपट तयार होतात. चला तर मग जाणून घेऊ या रेसिपी

दही पोहे रेसिपी

साहित्य

This is how quickly a human body gets dehydrated in summer
आला उन्हाळा, तब्येतीला सांभाळा! डिहायड्रेशन म्हणजे काय? डॉक्टरांनी सांगितली लक्षणे आणि उपाय
newly purchased vehicle motorcycle or car All You Need To know About Registration Certificates In Maharashtra details
कार, बाईकचं RC हरवलंय? घरबसल्या कसा कराल अर्ज? समजून घ्या संपूर्ण प्रोसेस
diy summer health care tips 4 things to avoid after returning home from heat in marathi
उन्हातून घरी परतल्यानंतर ३० मिनिटे चुकूनही करू नका ‘या’ चार गोष्टी; अन्यथा तब्येत बिघडलीच म्हणून समजा
Gavran Kharda Mandeli Recipe In Marathi
गावरान खर्डा मांदेली; अलिबाग स्पेशल रेसिपी एकदा खाल तर खातच रहाल, लगेच नोट करा
how to make crunchy pakora recipe
मुले, शिळ्या पोळ्यादेखील खातील कौतुकाने! फोडणीची पोळी नव्हे, बनवा ‘हा’ कुरकुरीत पदार्थ
Can Your Husband Boyfriend Pass This Love Test
तुमचा नवरा ‘ही’ चाचणी पास होईल का? ‘Husband Test’ महिलांना का वाटते गरजेची, उत्तर मिळाल्यावर पुढे काय?
benefits of turmeric milk and turmeric water
तुम्ही हळदी दूध प्यावे की हळदीचे पाणी? कोणत्या पेयाचा होतो सर्वाधिक फायदा; घ्या जाणून….
these yoga asanas to stay cool in summer
Yoga Mantra: उन्हाळ्यात शरीर ठेवायचंय थंड, तर मदत करतील ‘ही’ योगासनं; पाहा करण्याची योग्य पद्धत

१ कप पोहे
१ कप दही
१/४ टीस्पून मीठ
१/४ टीस्पून साखर
१/४ टीस्पून भाजलेले जिरे पावडर
३ टेबलस्पून तूप
१ टेबलस्पून मोहरी आणि जिरे
१/२ टीस्पून हिंग
कढीपत्ता
३ हिरव्या मिरच्या
२ सुक्या लाल मिरच्या
चिरलेली कोथिंबीर
१ टेबलस्पून उडीद जाळ
१/४ कप शेंगदाणे

हेही वाचा – तुम्ही कधी चटकदार कैरीची डाळ खाल्ली आहे का? नसेल तर ही घ्या सोपी रेसिपी

हेही वाचा – पौष्टिक पण चविष्ट असा मखाना उत्तपा! एकदा खाऊन तर पाहा, ही घ्या रेसिपी

कृती

एका जाळीच्या भांड्यात पोहे भिजवा. ५- ७ मिनिटे पोहे तसेच भिजू द्या. आता त्याच वाटग्यात जितके पोहे आहेत तितकेच दही घ्या. पाव चमचा जिरेपूड टाका. दही व्यवस्थित फेटून घ्या. साजूक तूप गरम करून त्यात जिरे मोहरी हिंग कडीपत्ता, ठेचून घेतलेल्या मिरच्या, शेंगदाणे, भिजवलेली उडीद डाळ टाकून व्यवस्थित भाजून घ्या. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीरी आणि दोन लाल मिरच्या टाका आणि गॅस बंद करा. तडका ५ मिनिटे बाजूला ठेवा. आता दह्यामध्ये अर्धी वाटी ताक टाका. कोथिंबीर टाका. त्यात पोहे टाकून एकत्र करा. त्यात तयार केलेला तडका टाका आणि एकत्र करा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार दही वापरू शकता. आता दही पोहे काहीवेळ फ्रिजमध्ये ठेवू थंड करा. थोड्यावेळाने थंडगार चविष्ट दही पोहे खाण्याचा आस्वाद घ्या.

टिप -दही फ्रिजमध्ये ठेवून थंड केले जातात त्यामुळे दही घट्ट होऊ शकते म्हणून ताक वापरले जाते.