Wheat Laduu Recipes: संध्याकाळी भूक लागल्यावर अनेकांना बाहेरचे अनारोग्यकारक पदार्थ खाण्याची सवय असते. मात्र, दररोज असे बाहेरचे पदार्थ खाणे आरोग्यास घातक असते. त्यामुळे तुम्हाला किंवा घरातील लहान मुलांसह भूक लागल्यास हे पौष्टिक लाडू नक्की करून बघा. घरच्या घरी आपण अनेकदा बेसनाचे, रव्याचे, डिंकाचे लाडू बनवतो. हे लाडू खायला चविष्ट आणि खूप पौष्टिकही असतात. पण, आज आम्ही तुम्हाला गव्हाचे लाडू कसे बनवायचे ते सांगणार आहोत.

गव्हाचे लाडू बनविण्यासाठी साहित्य:

१. २ वाटी गव्हाचे पीठ
२. २ वाटी बारीक गूळ
३. २ वाटी शेंगदाण्याचे कूट
४. २ वाटी तांदूळ
५. २ चमचे वेलची पूड
६. १ वाटी काजू-बदामाचे काप

गव्हाचे लाडू बनविण्याची कृती:

हेही वाचा: ‘मखाण्याची पौष्टिक खीर खाणं आरोग्यासाठी फायदेशीर; पटकन नोट करा साहित्य आणि कृती

१. सर्वांत आधी तांदूळ मिक्सरमधून जाडसर बारीक करून घ्यावेत.

२. त्यानंतर बारीक केलेले तांदूळ गरम कढईत तूप टाकून परतून घ्यावेत.

३. आता गव्हाचे पीठदेखील कढईत तूप टाकून, चांगले खरपूस भाजून घ्यावे.

४. तांदूळ आणि गव्हाचे पीठ भाजल्यावर थंड व्हायला बाजूला ठेवावे.

५. नंतर दोन्ही पदार्थ थंड झाल्यावर ते एकत्र करून, त्यात शेंगदाण्याचे कूट, बारीक गूळ, वेलची, काजू व बदामाचे काप घालावेत.

६. हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून, त्याचे लाडू वळायला घ्यावेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

७. सर्व लाडू तयार झाल्यावर त्यांचा आस्वाद घ्यावा.